बुधवार, ७ ऑक्टोबर, २०२६

गीता :- अध्याय पहिला

 

प्रसाद चिक्षे यांचे 'गीतादर्शन': भाग १ ते १५ (पूर्ण मजुरासह)

या संग्रहात कुरुक्षेत्रावरील रणांगणाच्या ऐन वेळी अर्जुनाच्या मनात निर्माण झालेल्या तीव्र मानसिक, भावनिक आणि बौद्धिक संघर्षाचे (विषादाचे) उत्कृष्ट आणि व्यावहारिक विश्लेषण केले आहे. हे लेखन अध्यात्माकडे केवळ धार्मिक ग्रंथ म्हणून न पाहता, आधुनिक मानसशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र, न्यूरोबायोलॉजी आणि दैनंदिन जीवनातील सोप्या उदाहरणांच्या माध्यमातून अतिशय सखोलपणे उलगडते.

अनुक्रमणिका (Table of Contents)

  1. भाग १: ‘स्वभावोऽध्यात्ममुच्यते’ आणि प्रस्थानत्रयी: आत्मशोधाचा अभ्यासयोग
  2. भाग २: धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे (The Inner Battlefield)
  3. भाग ३: धृतराष्ट्राची मनःस्थिती आणि शंका
  4. भाग ४: भगवद्गीतेतील रूपक: मोह आणि विवेक
  5. भाग ५: मोह, अहंकार आणि आत्मशुद्धीचा महामार्ग
  6. भाग ६: कुरुक्षेत्रावरील दोन दृष्टीकोन
  7. भाग ७: धर्मसंकट, शाश्वत मूल्यांचा विवेक आणि विस्ताराचे जीवन
  8. भाग ८: कुरुक्षेत्रावरील शंखनाद: अंतर्मनाचा विवेक आणि सामूहिक चेतनेचा ब्रह्मनाद
  9. भाग ९: अध्यात्म, शुद्ध चैतन्य आणि ईश्वरी संकेत
  10. भाग १०: अर्जुनाचा विषाद आणि मोहाचे मानसशास्त्र
  11. भाग ११: अर्जुन, आई आणि मी आणि आईचा शेवटचा क्षण
  12. भाग १२: अभ्यासाची पंचसूत्री आणि गीतेचे प्रयोजन / न्यूरोबायोलॉजिकल परिणाम
  13. भाग १३: धोका आहे... आत्महत्या करू नका / विषाद आणि बुद्धी
  14. भाग १४: स्वतः तयार केलेला व्हायरस स्वतःच्या सिस्टिम मध्ये
  15. भाग १५: जेव्हा मन रणांगण बनते

भाग १: ‘स्वभावोऽध्यात्ममुच्यते’ आणि प्रस्थानत्रयी: आत्मशोधाचा अभ्यासयोग

भारतीय आणि हिंदुत्व ही एकाच नाण्याची, एकाच संस्कृतीची दोन प्रतिरूपे आहेत. या संस्कृतीचा आणि जीवनपद्धतीचा मूळ गाभा अध्यात्मात दडलेला आहे. ज्यावेळी "अध्यात्म म्हणजे काय?" असा प्रश्न समोर येतो, त्यावेळी श्रीमद्भगवद्गीतेमध्ये (अध्याय ८, श्लोक ३) श्रीकृष्ण अत्यंत मार्मिक व्याख्या करताना म्हणतात— "स्वभावोऽध्यात्ममुच्यते" म्हणजेच, स्वतःचा मूळ स्वभाव जाणून घेणे, स्वतःच्या अंतरात्म्यात प्रविष्ट होणे म्हणजेच अध्यात्म!

आपला मूळ स्वभाव नेमका कसा आहे आणि तो कसा असावा, हे जाणून घेण्यासाठी आपल्या ऋषीमुनींनी आणि संस्कृतीने अनेक मार्ग सांगितले आहेत. ज्याप्रमाणे श्रद्धा आणि भक्ती वृद्धिंगत करण्यासाठी आपण 'चारधाम यात्रा' करतो, ज्याप्रमाणे मानवी जीवनाला परिपूर्ण आणि सुसंस्कृत बनवण्यासाठी '१६ संस्कार' सांगितले आहेत, अगदी तसाच एक अत्यंत महत्त्वाचा आणि श्रेष्ठ मार्ग म्हणजे 'अभ्यासाचा मार्ग' (स्वाध्याय)!

या अभ्यास मार्गाचे एक वैशिष्ट्य आहे— आपल्या संस्कृतीने कधीही "केवळ एकाच ग्रंथाचा अभ्यास करा" असे म्हटले नाही. संकुचितता सोडून व्यापकता अंगीकारण्यासाठी अनेक ग्रंथांचा, विविध विचारांचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला गेला आहे. ज्ञान एकांगी राहू नये, तर ते परिपूर्ण व्हावे यासाठी ज्या प्रमुख तीन ग्रंथांच्या एकत्रित अभ्यासाचा मार्ग सांगितला आहे, त्यालाच 'प्रस्थानत्रयी' असे म्हटले जाते.

या प्रस्थानत्रयीमध्ये खालील तीन ग्रंथांचा समावेश होतो: १. श्रुति प्रस्थान (उपनिषदे): जे आपल्याला परम सत्याचे मूळ ज्ञान (Theory) देतात. २. स्मृति प्रस्थान (श्रीमद्भगवद्गीता): जे त्या ज्ञानाचे मानवी जीवनातील व्यावहारिक रूप (Practical) समजून सांगतात. ३. न्याय प्रस्थान (ब्रह्मसूत्र): जे तर्काच्या (Logic) कसोट्यांवर त्या ज्ञानाची सुसंगतता सिद्ध करते.

त्यामुळे, ज्यावेळी आपण "गीतेचा अभ्यास का करायचा?" हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी आपल्याला प्रस्थानत्रयीची माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. गीतेचा अभ्यास हा केवळ एका स्वतंत्र ग्रंथाचा अभ्यास नसून, तो उपनिषदांचे ज्ञान आणि ब्रह्मसूत्राचा तर्क यांच्याशी जोडलेला एक संपूर्ण ज्ञानयोग आहे. स्वतःचा मूळ सात्त्विक स्वभाव ओळखण्यासाठी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी या प्रस्थानत्रयीचा अभ्यास हाच खऱ्या अर्थाने आत्मज्ञानाचा राजमार्ग ठरतो.

'प्रस्थान' म्हणजे एखाद्या उद्दिष्टाकडे किंवा मार्गाकडे निघणे (इथे याचा अर्थ 'परम सत्याचा मार्ग' असा आहे) आणि 'त्रयी' म्हणजे तीन ग्रंथांचा समूह.

भाग २: धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे (The Inner Battlefield)

भगवद्गीता सुरूच होते पहिल्या श्लोकापासून. इथे 'धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः। मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय॥'

धृतराष्ट्राचा हा श्लोक धृतराष्ट्राच्या मनातील भावना आणि धृतराष्ट्राची मानसिक स्थिती दर्शवतो. हा श्लोक आणि याच्यातला पहिला भाग जर नीट समजून घेतला, तर आपल्याला गीता अधिक रिलव्हंट (सुसंगत), आपल्यासाठी उपयोगी आणि समाजासाठी उपयोगी आहे, असं लक्षात यायला लागतं.

'धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे' हे दोन शब्द खूपच महत्त्वाचे आहेत तिथे. भारतीय तत्त्वज्ञानामध्ये 'क्षेत्र' या शब्दाला खूप महत्त्व आहे. आपण अनेक ठिकाणी हा 'क्षेत्र' शब्द वापरतो— 'तीर्थक्षेत्र'. जी पुण्यस्थानं आहेत, पुण्यस्थळं आहेत, त्या सर्वांना आपण तीर्थक्षेत्र असं म्हणतो. आयुष्यामध्ये अशा तीर्थक्षेत्री जाण्याचा खूप लाभ होतो; म्हणून आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या यात्रा, वाऱ्या सांगितलेल्या आहेत.

'श्रीक्षेत्र' जिथे फक्त ईश्वराचं अधिष्ठान आहे, अस्तित्व आहे, त्या ईश्वरी ताकदीची कंपनं तिथे जाणवतात. तिथे सत्वगुणाच्या तन्मात्रांचं प्रमाण खूप अधिक असतं. जिथे येऊन मनाची शुद्धी होते, माणूस निर्मळ होतो, माणूस नम्र होतो; जिथे येऊन माणूस आपले सगळे भेद विसरतो, जिथे येऊन माणूस शरण येतो, 'मी'पणाचा त्याग करतो आणि सगळे षड्रिपू जिथे संपतात, अशा ठिकाणाला आपण 'क्षेत्र' किंवा 'श्रीक्षेत्र' म्हणतो.

भगवद्गीतेमध्ये सुद्धा एक पूर्ण अध्याय 'क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ' यावरचा आहे. तो अध्याय समजून घेताना आपण अधिक खोलात जाऊ. इथे 'धर्मक्षेत्र' हा शब्द वापरला आहे; धर्माचं क्षेत्र. धर्म म्हणजे काय? 'धारयति इति धर्मः'— जे आपण धारण करतो, तो म्हणजे धर्म आहे. अगदी व्यावहारिक पातळीवर असं म्हणू आपण की, आपलं कर्तव्य म्हणजे धर्म आहे. मग आपला स्वधर्म आला, कुलधर्म आला, अशा वेगवेगळ्या प्रकारे धर्माचा विचार केला जातो.

काही लोक धर्माला सीमित परिभाषेमध्ये मांडतात— प्रेषित, त्यांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान, नैतिकता, आपल्या आचारपद्धती, आपल्या परंपरा, रूढी. जीवन अधिक सुसह्य आणि सर्वसमावेशक, हार्मोनीमध्ये (सुसंवादाने) जगण्यासाठी सांगितलेले काही नियम— हे सगळं म्हणजे धर्म आहे. काही जण म्हणतात की, सत्य— शाश्वत सत्य— हे म्हणजे धर्म आहे. तसा धर्माचा वेगवेगळा अर्थ आपण करू शकतो. 'राष्ट्रधर्म' असा पण आपण अर्थ करतो. 'विश्वधर्म'— माऊलींनी हा शब्द वापरला; 'स्वधर्म ते विश्वधर्म' असा पसायदानामध्ये तो येतो.

क्षेत्र आणि धर्म... त्यामुळे हे युद्ध जिथे चालू आहे, ते पुण्यस्थळ आहे? आपण गमतीने विचार केला, तर जिथे हाणामार्‍या होणार आहेत, जिथे रक्ताचे पाट वाहणार आहेत, जिथे एकमेकांवर कुरघोडी होणार आहे, तिथे चुका देखील 'फेअर' असणार आहेत, कारण हे युद्ध आहे. मग अशा युद्धाच्या ठिकाणाला 'क्षेत्र' आणि ते देखील 'धर्माचं क्षेत्र' कसं काय म्हटलं आहे? गंमत म्हणजे, दोन आबाभाऊ (भाऊ-भाऊ) आपापसामध्ये संपत्तीसाठी, सत्तेसाठी, राज्यासाठी भांडत आहेत; त्याला 'धर्मक्षेत्र' कसं म्हणायचं त्या जागेला? मोठा प्रश्न आहे.

अरे, आपण विश्वाच्या कल्याणाचा विचार करणारे लोक! माऊलींनी 'जे खळांची व्यंकटी सांडो' असा आवाहन करणारे आपण लोक! 'सर्वे भवन्तु सुखिनः' असा विचार करणारे आपण लोक! इथे दोन भाऊ लढत आहेत आणि मरणार... म्हणजे एक पिढी बर्बाद होणार आहे आणि त्या पिढीचे परिणाम दीर्घकाळ होणार आहेत. असंही म्हणतात की, महाभारताच्या युद्धाचे परिणाम अगदी भारत पारतंत्र्यात जाण्यापर्यंत गेले. अशा ठिकाणाला 'धर्मक्षेत्र' कसं काय म्हणायचं? हा प्रश्न मनामध्ये आल्यानंतर आपण खऱ्या विचाराकडे जातो.

आता हा धृतराष्ट्राच्या तोंडचा श्लोक आहे. हा काही कृष्णाच्या याच्यातला नाही, संजयाच्या याच्यातला नाही किंवा भीष्मांच्या याच्यातला नाही. रूपकाच्या भाषेमध्ये हे जे 'धर्मक्षेत्रे' म्हटलेलं आहे, ते युद्धभूमीला म्हटलेलं आहे, त्या जागेला म्हटलेलं आहे. असं धर्मक्षेत्र आपल्या मनामध्ये पण आहे, आपल्या अंतरामध्ये पण आहे. त्यामुळे अंतरात्म्यातलं धर्मक्षेत्र आणि व्यावहारिक पातळीवर भौगोलिकदृष्ट्या जे युद्ध चाललं आहे ते क्षेत्र— ते धर्मक्षेत्र, ती युद्धभूमी आणि आपल्या मनामधली युद्धभूमी— या सर्वांचा व्यापार मांडणारा हा सगळा भाग आहे. त्यामुळे ज्यावेळी पहिला प्रश्न पडतो की, 'धर्मक्षेत्र' का म्हटलं आहे? याचा आपण खोल अर्थ समजून घ्यावा लागेल.

भाग ३: धृतराष्ट्राची मनःस्थिती आणि शंका (The Dual Dilemma of Dhritarashtra and Arjuna)

कुरुक्षेत्रावर होणारे हे धर्मयुद्ध आहे. त्या कुरुक्षेत्रालाच धर्मक्षेत्र असेही म्हटले आहे. एक प्रतीक असे म्हटले जाते की, कुरुक्षेत्र हे कर्माचे प्रतीक आहे. तिथे आधी अतिशय पवित्र कामे झालेली आहेत आणि उपनिषदांमध्ये त्यांचा उल्लेख आहे. त्यामुळे ही जी पवित्र भूमी आहे, तिथे सगळ्या गोष्टी या धर्मानुरूप होतात; म्हणून ते धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र.

धृतराष्ट्राची मनःस्थिती आणि शंका

आता हा श्लोक जो आहे, तो धृतराष्ट्राने म्हटलेला आहे. धृतराष्ट्र हा पहिल्यापासून महाभारताचा एक महत्त्वाचा साक्षीदार राहिलेला आहे. तो फारसा कुठेच बोललेला नाही; पण इथे त्याला कुतूहल आहे, त्याच्या मनामध्ये संदेह पण आहे की, बाबा! आता हे धर्मक्षेत्र है आणि हे कुरुक्षेत्र पण आहे. म्हणजे, इथे आपल्या पूर्वजांनी खूप तपश्चर्या केलेली आहे, खूप यज्ञ केलेले आहेत, खूप पुण्यकर्मे केलेली आहेत. त्यामुळे, इथे एक सात्विक तन्मात्रांचे अस्तित्व आहे. त्यामुळे या युद्धभूमीवर एक तर असेही होऊ शकते की, दुर्योधनाला उपरती होऊ शकते. मनोमन धृतराष्ट्राच्या मनामध्ये दुर्योधनाला उपरती व्हावी ही पण इच्छा आहे आणि दुसरीकडे दुर्योधनाचे भले व्हावे ही पण इच्छा आहे. पांडवांचे भले व्हावे का, हे माहित नाही; परंतु या युद्धामधून दुर्योधनाचे वाईट होऊ नये, हे मात्र मनोमन धृतराष्ट्राला वाटते. त्यामुळे युद्ध होऊ नये अशी एक मनामध्ये त्याची पुसटशी भावना असू शकते.

युद्धाचे स्वरूप आणि परिणाम

आपण जर एक विचार केला, या सगळ्या गोष्टीकडे पाहत असताना, तर या दोनों प्रतीकांचा विचार करत असताना हे युद्ध जे आहे, ते कौरव आणि पांडव या दोन गटांमध्ये आहे. पण ते दोन गट इतके बलशाली आहेत की, काही अक्षौहिणी सेना या युद्धामध्ये सहभागी होत आहे आणि याचे परिणाम खूप दूरगामी होणार आहेत, हे धृतराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे त्याच्या मनामध्ये या युद्धाच्या बाबतीमध्ये प्रचंड, काय म्हणतात त्याला, कुतूहल तर आहेच; परंतु अस्वस्थता आहे की काय होईल, काय नाही, काय होईल, काय होईल!

धृतराष्ट्र आणि अर्जुनाची अस्वस्थता

त्यामुळे ही अस्वस्थता जी आहे, त्या अस्वस्थतेने या भगवद्गीतेची सुरुवात होते. म्हणजे गीतेमध्ये फक्त अर्जुनच अस्वस्थ आहे असे नाही आहे, तर धृतराष्ट्र पण अस्वस्थ आहे आणि धृतराष्ट्र अस्वस्थ आहे, ते त्याच्या मोहापोटी आणि तेही पुत्रमोहापोटी. आणि तो पुत्रमोह आहे की, पुत्राचा पराभव होऊ नये, पुत्राचे नुकसान होऊ नये. याच काळामध्ये अर्जुन पण अस्वस्थ होतो, विषादामध्ये जातो, ते गुरूंच्या आणि पितामहांच्या मोहापोटी. दोनों मोह वेगळे आहेत. संकुचित मोह आणि उदात्त मोह असे थोडेसे म्हणता येऊ शकते; परंतु मोहच आहे.

दोनोंही मोहांमध्ये दोघेजण कर्तव्यापासून दूर गेलेले आहेत. धृतराष्ट्र पण कर्तव्यापासून दूर गेलेला आहे, अर्जुन पण कर्तव्यापासून दूर गेलेला आहे. त्यामुळे ही गीता जेवढी अर्जुनाला लागू पडते, तेवढीच धृतराष्ट्राला पण लागू पडते. म्हणजे संजयाच्या माध्यमातून धृतराष्ट्रासाठी पण ही गीता आहे आणि अर्जुनासाठी पण गीता आहे. धृतराष्ट्रावर गीतेचा काय परिणाम होतो आणि अर्जुनाचा काय गीतेवर परिणाम होतो, हे देखील आपल्याला या सगळ्या गोष्टीतून समजून घ्यायचे आहे.

धर्मयुद्धाचे पैलू आणि कारण अध्याय

आता आपण थोडेसे पुढे जाऊ.

"धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः। मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय।।"

'मामकाः' हा शब्द वापरला आहे; माझे आणि पांडवांचे. माझे म्हणजे कौरव.

आता हे धर्मयुद्ध आहे हे मान्य झाले, सत्याच्या विरुद्ध असत्याचा लढा आहे हे मान्य झाले. नंतर धर्माच्या विरुद्ध अधर्माचा लढा आहे असे समजू, सात्विकाच्या विरुद्ध तामसाचा लढा आहे असे समजू, कौरवांच्या विरुद्ध पांडवांचा तर आपण विचार केलेलाच आहे. एक न्यायव्यवस्था अस्तित्वात आहे; जी न्यायव्यवस्था, अशी न्यायव्यवस्था, जी माणसाच्या कलुषित मनाच्या, कलुषित बुद्धीवर, त्यांनी केलेल्या कार्यावर लगाम ठेवते. त्याच्यावर निर्णयात्मक मत ठेवते किंवा निर्णयात्मक अंकुश ठेवते, असे हे युद्ध आहे. या युद्धामध्ये नुसता पराभव होणार नाही आहे किंवा कोणाचा तरी जय होणार नाही; दोनों भागांची प्रचंड हानी होणार आहे.

दुसरे, या युद्धामध्ये सूड, अनेकांच्या प्रतिज्ञा आहेत, अनेकांचे सूड घ्यायचे आहेत आणि त्या प्रतिज्ञा पणाला लागणार आहेत. आणि या युद्धामधून युद्धशास्त्राच्या अनेक गोष्टी, अनेक, अनेक, अनेक काय म्हणतात पैलू आपल्याला लक्षात येणार आहेत. त्यामुले एकदा पहिला अध्याय आपण नीट समजून घ्यायला लागलो, की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी भगवद्गीतेतल्या समजायला लागतील. असे म्हणता येईल की, पहिला अध्याय हा 'कारण अध्याय' आहे. हे जे कारण आहे, ते जर समजून घेतले तर आपल्याला भगवद्गीतेचा नीट विचार करता येतो.

अर्जुनविषादयोग

दुसरा, याला 'अर्जुनविषादयोग' असे म्हटले आहे; 'धृतराष्ट्रविषादयोग' असे नाही म्हटलेले. कारण, मोह अर्जुनाला पण झालेला आहे, मोह धृतराष्ट्राला पण आहे; पण मोहाचे रूपांतर विषादामध्ये होण्यासाठी थोडे सात्विकता लागते, थोडे प्रेम लागते, थोडे माया लागते, थोडी आपुलकी लागते आणि ती थोडीशी अधिक चांगली लागते. ती वाईटच आहे; परंतु ती अधिक चांगली लागते. त्यामुळे अशाच लोकांच्या मोहाचा विषादामध्ये रूपांतर होतो, ज्यांच्यामध्ये सात्विकता आहे. धृतराष्ट्रामध्ये मात्र ती नाही आहे. धृतराष्ट्रामध्ये सात्विकतेपेक्षा तामसिकता आणि राजसिकता जास्त आहे; त्यामुळे त्याचा मोह हा विषादामध्ये रूपांतरित झाला नाही. अर्जुनाची जी अवस्था झाली होती, हे सगळे पाहत असताना, हे सगळे समजून घेत असताना, तशी धृतराष्ट्राची झालेली नाही आहे.

त्यामुळे याला 'अर्जुनविषादयोग' असे सांगितले आहे. म्हणजे मोह धृतराष्ट्राचा पण आहे, तो विषादाकडे जात नाही आहे. अर्जुनाचा मोह आहे, तो विषादाकडे जातो आणि त्या विषादाचे परिमार्जन करण्यासाठी अर्जुन कृष्णाच्या बरोबर आहे; त्यामुळे त्याचे योगामध्ये रूपांतर होते. असा हा 'अर्जुनविषादयोग' आहे.

भाग ४: भगवद्गीतेतील रूपक: मोह आणि विवेक (The Charioteer of Conscience)

बुद्धीचा दुसरा प्रेझन्स (अस्तित्व) जो जाणवतो, तो अगदी मूलभूत सिद्धांतामध्ये — 'आहार-निद्रा-भय-मैथुनं च, बुद्धिर्हीना पशुभिः समानाः' (अर्थात: बुद्धी नसेल, तर आपण पशूसमान आहोत). पण ही बुद्धी गमतीदार आहे. शुद्ध बुद्धी असली पाहिजे आणि ही शुद्ध बुद्धी 'चित्तशुद्धी'मधून मिळते, असं म्हटलं जातं.

महाभारताचे साहित्यिक आणि नाट्यमय सौंदर्य

महाभारत जसं एक छान तत्त्वज्ञान सांगतं, तशीच ही खूप छान रूपकात्मक कथा आहे. ही एक सुंदर वाङ्मयीन पद्धती आहे. त्यातला 'गीता' हा भाग तर विचारूच नका! अफलातून! त्याचं असं वाङ्मयीन सौंदर्य, साहित्यिक सौंदर्य तर जबरदस्त आहे. व्यासांनी कशा कशा पद्धतीने मनुष्य जीवनाचं मर्म याच्यामध्ये सांगितलं आहे, ते लक्षात येतं. गीतेतलं तत्त्वज्ञान पाहत असताना देखील गीतेमधलं जे नाट्यमय रित्या जी गीता दिसते ना आपल्याला, जो प्रेझन्स दिसतो ना गीतेचा, तो अफलातून आहे.

आता बघा, गीतेची सुरुवात धृतराष्ट्राच्या श्लोकाने होते. धृतराष्ट्राला जे सगळं गीता सांगतोय, दाखवतोय किंवा 'टेलीकास्ट' करतोय, त्याच्यासमोर वदतोय, तो म्हणजे संजय. संजय हा धृतराष्ट्राचा सारथी आहे. आपण आता दुसरीकडे बघू; दुसरीकडे अर्जुन आहे आणि अर्जुनाचं सारथ्य करतोय श्रीकृष्ण.

अर्जुनाच्या बद्दल आणि श्रीकृष्णाच्या बद्दल सांगायची फारशी गरज नाही. श्रीकृष्णाबद्दल तर काही सांगायची गरजच नाही, आपण संजयाबद्दल थोडं बोलू. संजय हा सूतपुत्र. सूतपुत्रांमध्ये तो रथाचा सारथी आहे, धृतराष्ट्राच्या रथाचा सारथी आहे. हे सारथी असणं फार महत्त्वाचं बरं का इथे!

दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, तो धृतराष्ट्राचा मंत्री पण आहे आणि तो खूप चांगला सल्लागार आहे. सारथ्य जो करतो तो सारथी, त्याचं एक वैशिष्ट्य असं असतं (जे महाभारतात सांगितलेलं आहे), तो 'अॅन्सेस्ट्रल हिस्टरी' (वंशपरंपरागत इतिहास) म्हणजेच आपल्या वंशजांचे गुणगौरव सांगत असतो. त्यांचे विशिष्ट कौतुक किंवा त्यांच्या अफाट पराक्रमाच्या गोष्टी तो रथात बसलेल्या व्यक्तींना सांगत असतो. संजयाचे वडील पण 'ग्रेट' माणूस होते. महाभारताच्या 'उद्योगपर्वा'मध्ये युद्ध होऊ नये म्हणून जी शिष्टाई केली जाते, त्यामध्ये संजय येतो. म्हणजेच कौरवांकडून संजय येतो आणि पांडवांकडून श्रीकृष्ण येतात.

आता हे सगळं पाहिल्यानंतर आपण खऱ्या रूपकाकडे येऊ. सारथी म्हणजे बुद्धी. संजय हा विवेकाचं स्वरूप आहे. धृतराष्ट्र हा मोहाचं स्वरूप आहे. इकडे अर्जुन पण मोहाचं स्वरूप आहे. श्रीकृष्ण पण सारथी आहेत, जे बुद्धीचं आणि विवेकाचं स्वरूप आहेत.

म्हणजेच, दोन सारथी आहेत आणि दोघे मोहग्रस्त आहेत. संजयाला विश्वरूप दर्शन झालेलं आहे आणि अर्जुनाला पण झालेलं आहे. संजय कुठलाही शब्द न गाळता धृतराष्ट्राला जसंच्या तसं गीता सांगतोय. श्रीकृष्ण तर शुद्ध बुद्धीचे आहेतच, पण संजय पण शुद्ध बुद्धीचा आहे. तो दुर्योधनाचा मोह स्वतः पण संपवण्याचा प्रयत्न करतो आणि अर्जुनाचा मोह संपावा म्हणून श्रीकृष्ण गीता सांगतात. म्हणजे संजयाचे पण प्रयत्न चालू आहेत; श्रीकृष्णाच्या मदतीने संजय स्वतःहूनही काही गोष्टी सांगतो आणि प्रयत्न करतो की धृतराष्ट्राचा मोह जावा, पण तो काही जात नाही.

अर्जुनाचा मोह मात्र जातो. शेवटच्या अध्यायामध्ये, म्हणजेच अठराव्या अध्यायामध्ये तो म्हणतो — 'नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा'. त्यामुळे भगवद्गीता ही मोह आणि विवेक, मोह आणि बुद्धी, मोह आणि सारथी यांची कथा आहे. धृतराष्ट्र आणि संजय (सारथी), अर्जुन आणि श्रीकृष्ण (सारथी).

जीवनाचा संदेश

तुमच्या आयुष्यामध्ये असा योग्य सारथी असावा. महात्मा गांधी फार छान पद्धतीने सांगतात; ते म्हणतात, "प्रत्येक माणसामध्ये मोह पण असतो आणि विवेक पण असतो. मोह पदोपदी जागृत होत असतो, त्यावेळी विवेकाने त्याचं शमन करायचं असतं आणि तो शुद्ध विवेक आपल्यामध्ये निर्माण करावा लागतो."

त्यामुळे महाभारत आणि त्यातल्या त्यात भगवद्गीता ही मोह आणि विवेकाची जोडी घेऊन येते. धृतराष्ट्र आणि संजयाची, तसेच श्रीकृष्ण आणि अर्जुनाची जोडी घेऊन येते.

त्यामुळे मोहावर लगाम घालायचा असेल तर 'बुद्धिं तु सारथिं विद्धि' म्हणजेच बुद्धीचा, विवेकाचा सारथी असला पाहिजे. परंतु, मोह जर अधिक बलवान असेल, त्याचं भरणपोषण खूप चांगल्या पद्धतीने केलं गेलं असेल, तर सारथी किंवा विवेक कितीही शुद्ध असला तरीही मोह संपत नाही. धृतराष्ट्राचा मोह संपला नाही; अर्जुनाचा मात्र मोह संपला आणि तो आपल्या कर्तव्यासाठी तत्पर झाला. शेवटी तो म्हणतो की, "यापुढे मी माझ्या कर्तव्याप्रमाणे, म्हणजेच विवेकाप्रमाणे युद्ध करेन."

भाग ५: मोह, अहंकार आणि आत्मशुद्धीचा महामार्ग (The Mirror of Dharma)

भगवद्गीता आपल्यासाठी आहे का?

मोह, अहंकार आणि आत्मशुद्धीचा महामार्ग: भगवद्गीता

महाभारताचे युद्ध केवळ कुरुक्षेत्रावर झालेले दोन सैन्यांमधील युद्ध नव्हते, तर ते मानवी मनाच्या अंतर्द्वंद्वाचे आणि विकारांचे एक जिवंत प्रतीक आहे. श्रीमद्भगवद्गीतेचा पहिला अध्याय हा 'अर्जुनविषादयोग' म्हणून ओळखला जातो, ज्याला आपण गीतेचा कारणाध्याय म्हणू शकतो. परंतु, या महायुद्धाच्या मूळ कारणाचा शोध घेतला, तर त्याचे धागेदोरे कुरुक्षेत्राच्या मैदानाबाहेर, हस्तिनापूरच्या राजवाड्यात अंधारात बसलेल्या एका व्यक्तीच्या मानसिकतेत सापडतात—ती व्यक्ती म्हणजेच धृतराष्ट्र.

दुर्योधनाचा अहंकार: मोहाचा वारसा

आई-वडिलांच्या अंध मोहाचे संस्कार दुर्योधनावर पडले. धृतराष्ट्राच्या मनात पांडवांबद्दल असलेली सुप्त निगेटिव्हिटी दुर्योधनाच्या ठायी उघड्या मत्सराच्या आणि अहंकाराच्या रूपाने वाढीस लागली. दुर्योधन हा धृतराष्ट्रासारखा भित्रा नव्हता; तो बेदिक्कतपणे अधर्माचा मार्ग चोखाळणारा होता. दुर्योधनाची मानसिक स्थिती पांडवगीतेतील एका प्रसिद्ध श्लोकातून स्पष्ट होते: अर्थात, "मला धर्म काय आहे हे माहीत आहे, पण त्यात माझी प्रवृत्ती नाही. मला अधर्मही माहीत आहे, पण त्यापासून दूर राहण्याची माझी वृत्ती नाही."

हीच ती मानवी मनाची शोकांतिका आहे. जेव्हा माणसाच्या अंतर्मनात चित्त अशुद्धीमुळे अहंकार आणि मत्सर पक्के होतात, तेव्हा त्याची आत्मशक्ती झाकोळून जाते. योग्य काय आणि अयोग्य काय हे समजण्याची बुद्धी असूनही, माणूस अयोग्य मार्गाकडे ओढला जातो आणि स्वतःच्या चुकीच्या कृत्यांचे समर्थन करू लागतो.

भगवद्गीतेची प्रस्तुतता: आपल्यासाठी काय संदेश?

अनेकदा प्रश्न पडतो की, भगवान श्रीकृष्णाने गीता दुर्योधनाला का नाही सांगितली? तसा प्रयत्न महाभारताच्या उद्योगपर्वात झाला, पण अहंकाराने आंधळा झालेला दुर्योधन तो उपदेश पचवू शकला नाही. मग धृतराष्ट्राला गीतेची काय गरज होती?

युद्ध भूमीवर प्रत्यक्ष अर्जुनाला गीता सांगितली जात असताना, संजय दूरदृष्टीने तो संवाद धृतराष्ट्राला ऐकवत होता. धृतराष्ट्राचा हाच मोह महायुद्धाचे मूळ कारण होता. त्या मोहावर तत्त्वज्ञानाचा आघात करणे, त्याला ईश्वरी सत्याचे दर्शन घडवून अंतर्मुख करणे, हा श्रीकृष्णाचा शेवटचा कारुण्यपूर्ण प्रयत्न होता. धृतराष्ट्राचा 'पुत्रमोह' इतका पराकोटीचा होता की, जेव्हा कधी त्याने दुर्योधनाला पांडवांवर होणाऱ्या अन्यायापासून रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दुर्योधनाने त्याला थेट आत्महत्येची धमकी दिली. या धमकीपुढे धृतराष्ट्राचा दुबळा पुत्रमोह आणि सत्तेची सुप्त हाव पुन्हा शरण आली आणि त्याने अधर्माला मूक संमती दिली.

निष्कर्ष: चित्तशुद्धीचा संदेश

भगवद्गीता केवळ अर्जुनाचा विषाद दूर करण्यासाठी नाही, तर ती धृतराष्ट्राच्या 'मोहावर' आणि दुर्योधनाच्या 'अहंकारावर' केलेला आध्यात्मिक प्रहार आहे.

मोह आणि अहंकार हे मानवी जीवनाचा आणि विनाशाचा मार्ग आहेत. गीतेचा मुख्य उद्देश हा आहे की, माणसाच्या मनात असा आत्मविनाशक मोह निर्माणच होऊ नये; आणि जर तो थोडाफार निर्माण झाला असेल, तर तो मुळासकट उखडून टाकता यावा.

आपल्या 'कारण शरीरात' आणि 'सूक्ष्म शरीरात' साचलेले मळ, विक्षेप आणि अशुद्धी दूर करून चित्त शुद्ध करण्यासाठी भगवद्गीता आजही प्रत्येक मानवाला मार्ग दाखवणारी प्रकाशशलाका आहे. म्हणूनच भगवद्गीता आपल्यासाठी आहे.


भाग ६: कुरुक्षेत्रावरील दोन दृष्टीकोन (The Psychological Conflict of Kurukshetra)

कुरुक्षेत्रावरील दोन दृष्टीकोन: अंतर्मनाचा संघर्ष आणि गीतेची अनिवार्यता

श्रीमद्भगवद्गीता हा केवळ दोन सैन्यांमधील युद्धाचा इतिहास नाही, तर ते मानवी अंतर्मनात चालणाऱ्या नित्य संघर्षाचे मानसशास्त्र आहे. गीतेच्या पहिल्या अध्यायात, शंखनाद होण्यापूर्वी, कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर दोन प्रमुख पात्रे संपूर्ण सैन्याचे निरीक्षण करतात—एक दुर्योधन आणि दुसरा अर्जुन. या दोन्ही पात्रांच्या पाहण्याच्या दृष्टीकोनात जो सूक्ष्म फरक आहे, तोच मुळात आसुरी वृत्ती आणि दैवी वृत्ती यांमधील फरक स्पष्ट करतो.

१. दुर्योधनाचा विश्लेषणात्मक आणि अहंकारी दृष्टीकोन

युद्धाच्या सुरुवातीला संजय धृतराष्ट्राला युद्धभूमीचे वर्णन ऐकवत आहे. तिथे दुर्योधन दोन्ही सैन्यांचे अतिशय बारकाईने निरीक्षण (Analysis) करतो, ज्याला आपण लष्करी भाषेत 'रेकी' (Reconnaissance) करणे असे म्हणू शकतो. या निरीक्षणादरम्यान तो आपले गुरु द्रोणाचार्य यांच्याकडे जातो.

द्रोणाचार्य हे कौरव सेनेचे मुख्य सेनापती नसूनही दुर्योधन आधी त्यांच्याकडे का जातो? याचे मानसशास्त्रीय कारण असे की, जेव्हा एखादी व्यक्ती आतून अस्वस्थ या घाबरलेली असते, तेव्हा ती स्वतःला सावरण्यासाठी बुद्धीचा किंवा ज्ञानाचा आधार शोधते. द्रोणाचार्य हे केवळ शस्त्रविद्येचे पंडित नव्हते, तर ते पांडव आणि कौरव या दोघांचेही गुरु होते. त्यांना दोन्ही बाजूंच्या योद्ध्यांची ताकद (Strengths) आणि उणिवा (Weaknesses) ठाऊक होत्या.

दुर्योधन द्रोणाचार्यांसमोर सर्वप्रथम शत्रुपक्षातील 'द्रुपदपुत्राचा' (धृष्टद्युम्न) उल्लेख करतो. ही दुर्योधनाच्या मनातील सुप्त भीती दर्शवते, कारण धृष्टद्युम्नाने द्रोणाचार्यांचा वध करण्यासाठीच जन्म घेतला होता. दुर्योधनाच्या दृष्टीकोनात खालील वैशिष्ट्ये दिसतात:

  • शक्ती आणि व्यक्तींचे मूल्यमापन: तो समोर उभ्या असलेल्या सैन्याला केवळ 'शत्रू' किंवा 'व्यक्तींची ताकद' या रूपात पाहतो.
  • अहंकार आणि अगतिकता: त्याच्या मनात युद्धाबद्दल कोणताही संशय नाही किंवा तडजोड करण्याची वृत्ती नाही. परंतु, स्वतःच्या सैन्याला 'अजेय' म्हणताना त्याच्या बोलण्यातून अहंकार आणि एकाच वेळी अंतर्गत भीती स्पष्ट जाणवते.

२. अर्जुनाचा तटस्थ आणि संवेदनशील दृष्टीकोन

दुसऱ्या बाजूला, अर्जुन भगवान श्रीकृष्णांना त्याचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेण्याची विनंती करतो. अर्जुनाची ही भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे; तो एका 'तटस्थ' (Neutral) जागेवरून परिस्थितीचे अवलोकन करू इच्छितो.

परंतु, जेव्हा अर्जुन कौरवांच्या सैन्याकडे पाहतो, तेव्हा त्याला तिथे केवळ शत्रू किंवा योद्धे दिसत नाहीत. त्याला तिथे त्याचे पितामह भीष्म, गुरु द्रोणाचार्य, त्याचे भाऊ, मित्र आणि इतर आप्तजन (नातेवाईक) दिसू लागतात. अर्जुनाचा हा दृष्टीकोन संवेदनशील आणि मानवी मूल्यांनी समृद्ध आहे.

३. 'व्यक्तीची ताकद' विरुद्ध 'आप्तजन': मुख्य तात्विक फरक

दुर्योधन आणि अर्जुन यांच्यात हाच सर्वात मोठा तात्विक व आध्यात्मिक फरक आहे:

  • दुर्योधनाला युद्धभूमीवर केवळ 'शक्तीचे घटक' (Forces) दिसतात, तर अर्जुनाला तिथे 'संबंध' (Relationships) दिसतात.
  • अर्जुनाच्या मनात धर्म अजूनही जागृत आहे. समोरच्या व्यक्ती आपल्याविरुद्ध लढायला आल्या आहेत आणि आपल्याला त्यांचा संहार करावा लागणार आहे, हे माहीत असूनही त्याला त्यांच्याबद्दल 'आपलेपणा' वाटतो. याउलट, दुर्योधनाला असा कोणताही नातेसंबंध किंवा आपलेपणा जाणवत नाही; तो केवळ सत्तेचा आणि विजयाचा विचार करतो.

४. महाभारताचे आध्यात्मिक रूपक (Metaphor)

अनेक संतांनी आणि विचारवंतांनी, अगदी आद्य शंकराचार्यांपासून, ज्ञानेश्वर माऊलींपर्यंत आणि आधुनिक काळात महात्मा गांधींनी महाभारताला मानवी मनाचे रूपक मानले आहे.

  • पांडव पक्ष (दैवी गुण): पांडवांच्या बाजूने लढणारे राजे हे दैवी आणि चांगल्या गुणांचे प्रतीक आहेत, जे धर्माचे आचरण करतात.
  • कौरव पक्ष (आसुरी व बांधलेली वृत्ती): कौरवांच्या बाजूने लढणाऱ्या भीष्म, द्रोण, किंवा कर्णासारख्या महाभागांना धर्म आणि अधर्म यातील फरक ठाऊक होता. परंतु, ते स्वतःच्या प्रतिज्ञा, उपकार किंवा सामाजिक बंधनांमध्ये अशा ठिकाणी 'अडकले' होते की, त्यांना इच्छा नसतानाही अधर्माची बाजू घ्यावी लागली. आपल्या अंतर्मनातही अनेकदा चांगले विचार परिस्थितीच्या किंवा आसक्तीच्या बंधनात अडकतात, तेव्हा असाच संघर्ष निर्माण होतो.

५. गीतेची गरज कोणाला?

या संपूर्ण विश्लेषणातून एक अत्यंत सुंदर आध्यात्मिक सत्य समोर येते—दुर्योधनाला कधीही 'विषाद' (गोंधळ किंवा मानसिक दुःख) होत नाही, पण अर्जुनाला 'विषाद' होतो.

दुर्योधन स्पष्ट आहे (जरी तो अधर्माच्या बाजूने असला तरी). त्याला संभ्रम नाही, म्हणून त्याला गीतेच्या उपदेशाची गरज भासत नाही. याउलट, अर्जुन चांगला आहे, संवेदनशील आहे, म्हणूनच कर्तव्य आणि आसक्ती यांच्यात त्याचा गोंधळ होतो.

गीतेची गरज बऱ्याच अंशी दुष्टांपेक्षा 'चांगल्या' लोकांनाच जास्त असते. कारण वाईट प्रवृत्तीचे लोग त्यांच्या उद्दिष्टांबद्दल स्पष्ट असतात, परंतु चांगल्या आणि संवेदनशील व्यक्तीच जीवनाच्या कठीण प्रसंगात, कर्तव्याच्या मार्गावर चालताना 'गोंधळात' पडण्याची शक्यता जास्त असते. अशाच गोंधळलेल्या अंतर्मनाला योग्य दिशा दाखवण्यासाठी 'श्रीमद्भगवद्गीता' हा सार्वकालिक मार्गदर्शक ग्रंथ ठरतो.

भाग ७: धर्मसंकट, शाश्वत मूल्यांचा विवेक आणि विस्ताराचे जीवन (Ethics of Expansion)

"महाराज, इथे एक हरीण आले होते का? मला त्याची शिकार करायची आहे. ते कोणत्या रस्त्याने गेले, तुम्हाला माहीत आहे का?"

मूल्यांचा संघर्ष आणि संभ्रम

आता ऋषींसमोर एक फार मोठा संभ्रम निर्माण झाला. त्यांच्या डोळ्यांसमोर त्या हरणाचा भयभीत चेहरा, त्याच्या तोंडचा फेस आणि त्याचे अस्तित्व फिरू लागले. काय करावे आणि काय करू नये, हे त्यांना सुचेनासे झाले.

  • जर त्यांनी सत्य सांगितले, तर हरणाचा मृत्यू निश्चित होता. त्या निरपराध जिवाच्या हत्येचे कारण स्वतः ऋषी आणि त्यांचे सत्य ठरणार होते.
  • जर त्यांनी असत्य सांगितले (खोटे बोलले), तर इतक्या वर्षांपासून त्यांनी कमावलेली महती, त्यांचे श्रेष्ठत्व आणि लोकांचा त्यांच्यावर असलेला विश्वास एका क्षणात नष्ट होणार होता.

जेव्हा स्वतःची वैयक्तिक व्रते, प्रतिज्ञा पणाला लागतात आणि दुसऱ्या बाजूला 'अहिंसा' सारखे शाश्वत मूल्य उभे राहते, तेव्हा नेमके काय जपावे? पातंजल योगसूत्रात यम-नियमांमध्ये 'अहिंसा' आणि 'सत्य' दोन्ही सांगितले आहे. 'सत्यमेव जयते' असेही आपण मानतो, पण मग 'अहिंसा प्रतिष्ठापना' याचे काय? अशा प्रसंगालाच 'धर्मसंकट' म्हणतात. सत्य आणि अहिंसा, दोन्ही धर्माचीच लक्षणे आहेत. पण इथे ऋषींचे वैयक्तिक व्रत (सत्य) हे एका जिवाच्या रक्षणाशी (अहिंसेशी) संघर्ष करत होते.

आपल्या आयुष्यातील 'लोणावळा' प्रसंग

अशी धर्मसंकटे केवळ ऋषी-मुनींच्याच आयुष्यात येतात असे नाही, तर आपल्या दैनंदिन जीवनातही अनेकदा येतात. आपण म्हणतो की 'भ्रष्टाचार करायचा नाही', आपण स्वतः कधी लाच घेत नाही; पण कधीकधी परिस्थिती अशी असते की काम व्हावे म्हणून आपण पैसे द्यायला तयार होतो.

माझ्याच आयुष्यातील एक प्रसंग सांगतो—विवेकानंद केंद्राच्या एका शिबिरानंतर मी लोणावळ्याहून पुण्याला माझ्या बहिणीच्या लग्नासाठी येत होतो. मी तिकीट काढले होते, पण अज्ञानामुळे मला माहीत नव्हते की ते तिकीट लोकलचे आहे आणि मी एक्सप्रेस ट्रेनमध्ये बसलो होतो. पुणे स्टेशनवर उतरल्यावर टीसीने मला पकडले. माझ्याकडे मर्यादित पैसे होते. तिकडे बहिणीच्या लग्नाची वेळ सकाळी १० ची होती आणि मला ९ वाजता पकडले होते.

आता माझ्यासमोर प्रश्न होता: 'भ्रष्टाचार करायचा नाही' हा माझा संकल्प, की 'बहिणीच्या लग्नाला वेळेवर पोहोचणे' हे भावाचे कर्तव्य? लग्नाला जाणेही तितकेच महत्त्वाचे होते. अशा वेळी दोन कर्तव्यांमध्ये, दोन मूल्यांमध्ये संघर्ष निर्माण होतो.

भीष्म पितामह: नैतिकतेचे मर्यादित अधिष्ठान

अशा धर्मसंकटांचे सर्वात मोठे जागतिक प्रतीक म्हणजे भीष्म पितामह. दुर्योधन नेहमी म्हणायचा: "जानामि धर्मं न च मे प्रवृत्तिः, जानाम्यधर्मं न च मे निवृत्तिः।" (मला धर्म माहीत आहे पण माझी त्यात प्रवृत्ती नाही, मला अधर्मही माहीत आहे पण मी त्यातून निवृत्त होऊ शकत नाही.)

दुर्योधनाच्या सूक्ष्म शरीरावर, त्याच्या अंतःकरणावर असणारे संस्कार त्याला सत्याचे दर्शन होऊ देत नव्हते. पण दुसरीकडे भीष्मांचे काय? भीष्म हे तर परम ज्ञानी, नैतिक होते. पण तरीही शुद्ध चेतना प्रत्यक्ष व्यवहारात आणताना भीष्मांचे स्वतःचेच नैतिक अधिष्ठान (त्यांची वैयक्तिक प्रतिज्ञा) त्यांच्या आड आली. त्यांनी समाजकल्याण किंवा व्यापक धर्मापेक्षा स्वतःच्या वैयक्तिक प्रतिज्ञेला जास्त महत्त्व दिले आणि ते अधर्माच्या (कौरवांच्या) बाजूने लढले.

या शाश्वत, विस्तारित मोठ्या धर्माचे प्रतिनिधित्व श्रीकृष्ण करतात. ते म्हणतात 'न धरी शस्त्र करी' (मी युद्धात शस्त्र उचलणार नाही), पण जेव्हा व्यापक धर्माच्या रक्षणाची वेळ येते, तेव्हा ते आपली प्रतिज्ञा मोडून हातात सुदर्शन चक्रही घेतात!

विस्ताराचे जीवन विरुद्ध संकुचिततेचा मृत्यू

स्वामी विवेकानंदांनी एक फार मोठा आध्यात्मिक विचार मांडला आहे: "विस्तार म्हणजेच जीवन आणि संकुचितता म्हणजेच मृत्यू" (Expansion is life, contraction is death). भगवद्गीता नेमकी याच तत्त्वज्ञानाचे प्रातिनिधिक अधिष्ठान आहे आणि महाभारत ही त्याचीच जिवंत अभिव्यक्ती आहे.

नव्या तत्त्वज्ञानाची पहाट

महाभारताच्या युद्धाच्या सुरुवातीला, भीष्म पितामह दुर्योधनाला खुश करण्यासाठी, त्याचा उत्साह वाढवण्यासाठी शंखाचा प्रचंड नाद करतात. "तस्य संजनयन् हर्षं कुरुवृद्धः पितामहः। सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दध्मौ प्रतापवान् ॥"

त्या शंखनादानंतर रणशिंगे फुंकली जातात, ढोल-नगारे वाजतात आणि युद्धाचे भयानक वातावरण तयार होते. भीष्मांनी दुर्योधनाला हर्षित करण्यासाठी हा शंखनाद केला खरा, पण त्यांना हे माहीत नव्हते की हा शंखनाद जुन्या परंपरांच्या अंताची आणि एका नव्या युगाची सुरुवात आहे.

भाग ८: कुरुक्षेत्रावरील शंखनाद: अंतर्मनाचा विवेक आणि सामूहिक चेतनेचा ब्रह्मनाद

कुरुक्षेत्रावरील शंखनाद: अंतर्मनाचा विवेक आणि सामूहिक चेतनेचा ब्रह्मनाद

महाभारताचे युद्ध केवळ दोन सैन्यांमधील भूमीचा लढा नव्हता, तर ते आदि-अंतापासून चालत आलेल्या 'धर्माधर्माचे' आणि सत्-असत प्रवृत्तींचे महायुद्ध होते. गीतेच्या पहिल्या अध्यायात जेव्हा दोन्ही बाजूंच्या शंखनादाचे वर्णन येते, तेव्हा वरवर केवळ युद्धाची घोषणा वाटणारा हा क्षण खोलवर पाहिल्यास मानवी व्यवस्थापन, मानसशास्त्र आणि अध्यात्माचा एक अप्रतिम वस्तुपाठ ठरतो.

या रणनादाकडे जेव्हा आपण विवेकाच्या दृष्टीने पाहतो, तेव्हा 'बाय मिशन' (ध्येयप्रेरित) आणि 'बाय कंपल्शन' (अगतिकता) या दोन वृत्तींमधील मूलभूत संघर्ष उलगडत जातो.

२. दिव्य रथ आणि व्यक्तिगत जबाबदारीचा पुकार (By Mission)

कौरवांच्या या गोंगाटाला उत्तर म्हणून जेव्हा पांडवांच्या बाजूने साक्षात भगवान श्रीकृष्ण आपल्या 'पाचजन्य' शंखाचा पुकार करतात, तेव्हा प्रतिसादाचे पारडे संपूर्णपणे बदलते. पांढरे शुभ्र घोडे जोडलेल्या एका दिव्य रथावर, म्हणजेच इंद्रियनिग्रहाच्या आणि शुद्ध स्वरूप चैतन्याच्या अधिष्ठानावर माधव विराजमान आहेत.

पांडवांच्या बाजूचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे—तिथे केवळ श्रीकृष्णाने किंवा अर्जुनाने शंख वाजवला नाही, तर भीम, युधिष्ठिर, नकुल, सहदेव या प्रत्येकाने आपापल्या शंखाचा स्वतंत्र नाद केला. हा 'इंडिव्हिज्युअल रिस्पॉन्सिबिलिटी' (व्यक्तिगत जबाबदारी) घेण्याचा सर्वोच्च क्षण आहे. पांडव सैन्यातील प्रत्येक योद्धा हा लाचारीने आलेला नव्हता, तर तो स्वधर्माची जाणीव ठेवून, स्वतःच्या पराक्रमाची नैतिक जबाबदारी स्वीकारून उभा होता. जेव्हा व्यक्तीचे ध्येय 'कृष्णाच्या' म्हणजेच अंतिम सत्याच्या बाजूने असते, तेव्हा त्याचा शंखनाद दिव्य ठरतो.

३. 'समष्टी' आणि 'व्यष्टी'चा मिलाफ: ज्ञान प्रबोधनीचा दुष्काळ लढा

स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे: 'Gathering of all scattered spiritual forces is the aim of my life' (विखुरलेल्या आध्यात्मिक शक्तींचे एकत्रीकरण हेच माझ्या जीवनाचे ध्येय आहे). हाच सिद्धांत जेव्हा आपण सामाजिक कार्यात आणतो, तेव्हा त्याचे रूपांतर एका मोठ्या चळवळीत होते.

ज्ञान प्रबोधनीच्या माध्यमातून जेव्हा आम्ही दुष्काळासारख्या भयानक संकटाविरुद्ध लढा पुकारला, तेव्हा गीतेतील हाच शंखनादाचा प्रसंग आमचा मार्गदर्शक होता. अशा संकटाच्या वेळी एकत्र कसे यायचे?

  • पहिले सूत्र: आपले उद्दिष्ट हे पवित्र, स्वच्छ आणि स्वार्थरहित असले पाहिजे. तिथे स्वतःची प्रतिष्ठा, स्वतःचे मोठेपण किंवा "आम्हीच नेते आहोत, आमच्याच मागे या" हा अहंकार विरघळवून टाकावा लागतो.
  • दुसरे सूत्र: समूहातील प्रत्येक घटकाची 'इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी' (वैयक्तिक ओळख) जपली पाहिजे.

दुष्काळ निवारणाच्या कार्यात आम्ही प्रत्येक गावाची, प्रत्येक संस्थेची ओळख जपली; पण त्या सर्वांच्या वैयक्तिक आकांक्षांना (Individual Aspirations) एका व्यापक सामूहिक ध्येयाशी (Collective Aspiration) जोडून घेतले—'आपल्या गावाला सुजलाम् सुफलाम् आणि समृद्ध गोकुळ बनवायचे आहे.' जेव्हा व्यक्तीचे छोटे ध्येय समष्टीच्या मोठ्या ध्येयात विलीन होते, तेव्हा रावणाविरुद्धच्या युद्धात खारुताईने दिलेल्या योगदानाप्रमाणे प्रत्येकाचे श्रमदान मौल्यवान ठरते आणि अशक्य वाटणारी कामेही सहज साध्य होतात.

४. ब्रह्मनाद आणि विकारांची विदीर्णता

जेव्हा व्यक्तिगत कर्तव्य आणि सामूहिक कर्तव्य एकाच सुरात ट्यून अप (Tune up) होतात, तेव्हा त्यातून 'इंटिग्रेशन' (एकात्मता) साधले जाते. पांडवांच्या बाजूने झालेला हाच तो सामूहिक आणि संघटित नाद होता, ज्याने केवळ कुरुक्षेत्र नाही तर आकाश आणि पृथ्वी दणाणून सोडली: "स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् ।"

साक्षात शुद्ध चैतन्याचा हा नाद जेव्हा असमंतात भिनतो, तेव्हा तो एक 'ब्रह्मनाद' बनतो. या दैवी आणि नैतिक बळाच्या आवाजाने अधर्मी शक्तींच्या मनात भीती निर्माण होते आणि त्यांचे अंतःकरण विदीर्ण होऊन जाते.

स्वतःच्या मोहासाठी, स्वार्थासाठी आणि अहंकारासाठी लढणारा दुर्योधनाचा पक्ष शेवटी पोकळ गोंगाट ठरला; तर सत्यासाठी, विथ पर्पज (ध्येयाने) आणि ईश्वरी अधिष्ठानाने लढणारा पांडवांचा पक्ष विजयी ठरला. आजच्या काळातही, जेव्हा आपण आपल्या अंतर्मनातील विकारांशी लढतो, तेव्हा आपल्यातील प्रत्येक सद्गुणाने (पांडवांनी) आपली वैयक्तिक जबाबदारी ओळखून श्रीकृष्णाच्या सुरात सूर मिसळणे आवश्यक आहे. हा सामूहिक विवेक म्हणजेच तो ब्रह्मनाद आहे, जो जीवनातील सर्व संकटांवर मात करण्याचे आत्मबळ प्रदान करतो.

प्रसाद चिक्षे

भाग ९: अध्यात्म, शुद्ध चैतन्य आणि ईश्वरी संकेत (Arjuna and the Divine Will)

अध्यात्म, शुद्ध चैतन्य आणि ईश्वरी संकेत

महाभारताच्या रणभूमीवर घडलेली श्रीमद्भगवद्गीता केवळ दोन सैन्यांमधील युद्धाचा प्रसंग नाही, तर तो मानवी मन, बुद्धी आणि ईश्वरी चेतना यांच्यातील संवादाचा सर्वोच्च आध्यात्मिक आविष्कार आहे. या महानाट्याचा केंद्रबिंदू असलेला 'अर्जुन' हा केवळ एक योद्धा नसून, तो शुद्ध आत्म्याचा आणि ईश्वरी इच्छेचा (Divine Will) एक दिव्यप्रतिनिधी आहे.

अर्जुनाचा अर्थ आणि त्याचे स्वरूप

'अर्जुन' या शब्दाचे अनेक विग्रह आणि अर्थ आध्यात्मिक परिप्रेक्ष्यातून उलगडतात:

  • कमावणारा किंवा मिळवणारा: अर्जुन हा केवळ भौतिक संपत्ती नव्हे, तर आत्मिक बळ आणि दैवी अस्त्रे कमवणारा साधक आहे.

युद्ध आणि अर्जुनाची भूमिका: 'God Proposes, Man Disposes'

आपल्याकडे सामान्यतः एक म्हण प्रचलित आहे: "Man proposes, God disposes" (माणूस बेत आखतो आणि ईश्वर तो फिरवतो). परंतु, कन्याकुमारी येथे स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा आणि एकनाथजींच्या जीवनकार्याचा अभ्यास करताना एक वेगळीच दृष्टी मिळते. तिथल्या अभ्यासातून कळून येते की, "Actually, God proposes, Man disposes" (ईश्वर संकल्प करतो, पण माणूस आपल्या अहंकाराने किंवा अज्ञानाने तो नाकारतो).

याचा युद्धाच्या संदर्भातील अर्थ समजून घेणे गरजेचे आहे: ईश्वराची अंतिम इच्छा (Divine Will) नेहमीच शांती, सुसंवाद आणि समतोल राखण्याची असते. सृष्टीच्या सामूहिक बुद्धिमत्तेतून (Collective Intelligence) and भावनांच्या शुद्ध स्वरूपातून (Purest form of emotions) ईश्वरी संकेत मिळतात. श्रीकृष्णाने स्वतः शांतीचा प्रस्ताव घेऊन दुर्योधनाकडे जाणे, हा ईश्वराचा शांतीचाच संकेत होता. परंतु, दुर्योधन आणि धृतराष्ट्र यांच्यातील 'मानवी संकेत', त्यांचा अहंकार, तामस आणि राजस प्रवृत्ती यांनी त्या ईश्वरी प्रस्तावाला नाकारले, म्हणजेच 'Dispose' केले.

रणांगणावरील अर्जुनाचा विषाद: ईश्वरी योजनेचा भाग?

युद्धाच्या निर्णायक क्षणी, जेव्हा शंखनाद होतो, तेव्हा अर्जुनाला वाटते की, आपण एकदा समोर पाहावे की आपल्याला नक्की कुणाशी युद्ध करायचे आहे. तो श्रीकृष्णाला सांगतो: "सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत" (हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा कर.)

आणि श्रीकृष्ण नेमका रथ कुठे उभा करतात? साक्षात भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य यांच्या समोर!

हा केवळ योगायोग नव्हता, ही ईश्वरी इच्छा (Divine Will) होती. अर्जुनाच्या मनात गोंधळ किंवा विषाद निर्माण होणे, हा त्याच्या दुबळेपणाचा लक्षण नव्हते. जो चुकीचा किंवा कपटी माणूस असतो, त्याच्या मनात कधीही अंतर्द्वंद्व किंवा गोंधळ निर्माण होत नाही. परंतु, जो शुद्ध बुद्धीचा, प्रामाणिक आणि स्व-च्या पलीकडे पाहणारा असतो, त्याला परिस्थितीचे गांभीर्य अधिक नेमकेपणाने दिसते.

अर्जुनाच्या मनात निर्माण झालेला विषाद (Arjuna Vishada) हा ईश्वराने घडवून आणलेला एक प्रयोग होता. या विषादाच्या माध्यमातून ईश्वराला धृतराष्ट्राला आणि दुर्योधनाला शेवटची संधी द्यायची होती.

धृतराष्ट्राला शेवटची चेतावणी

गीतेच्या माध्यमातून साक्षात ईश्वर धृतराष्ट्राला सांगू पाहत होता: "हे धृतराष्ट्रा, ज्या पांडवांच्या बळावर हे युद्ध जिंकणे शक्य आहे, तोच तुझा पुत्रतुल्य अर्जुन युद्धभूमीच्या मध्यभागी उभा राहून शस्त्र खाली टाकायला तयार आहे. तो अत्यंत निर्मळ मनाने सर्व काही सोडून भिक्षेचे जीवन जगायला तयार आहे. तो प्रामाणिकपणे स्वकीयांचा वध टाळू इच्छितो. त्याचा हा शुद्ध भाव पाहून तरी तुझा पुत्राचा मोह सोड, युद्ध थांबव आणि पांडवांना त्यांचे अधिकार दे. ते फार काही मागत नाहीयेत, लय नाही मागणं त्यांचं!"

परंतु, दुर्दैवाने धृतराष्ट्र आणि दुर्योधन हा ईश्वरी संकेत समजू शकले नाहीत. त्यांनी अतिशय धीराने आणि पक्केपणाने सामोरे जाणाऱ्या अर्जुनाचा हा निर्मळपणा ओळखला नाही.

अर्जुनाचा हा अभ्यासपूर्ण प्रवास आपल्याला हेच शिकवतो की, जेव्हा आपण आपल्या मनातील षड्रिपू, तामस-राजस प्रवृत्ती, अहंकार आणि मळ बाजूला सारून अतिशय निरपेक्ष (Neutral) पद्धतीने विचार करतो, तेव्हा आपली भावना ईश्वरी भावनेशी एकरूप होते. अर्जुन हा त्या शुद्ध, निरपेक्ष चेतनेचे प्रतीक आहे, ज्याच्या माध्यमातून ईश्वराने विश्वाला गीतेचे अमृत दिले. पण जिथे मानवी अहंकार आंधळा होतो, तिथे ईश्वराचा शांतीचा प्रस्ताव नाकारला जातो आणि शेवटी ईश्वरी न्यायाचे 'गांडीव' सरसावावेच लागते.

गीता वाचू गीता समजून घेऊ... स्वतः शुद्ध होऊ....

प्रसाद चिक्षे

भाग १०: अर्जुनाचा विषाद आणि मोहाचे मानसशास्त्र (The Psychology of Arjuna’s Despair and Attachment)

अर्जुनाचा विषाद आणि मोहाचे मानसशास्त्र

श्रीमद्भगवद्गीतेचा अभ्यास करत असताना, जर आपण तिच्याकडे एकाच दृष्टिकोनातून न पाहता अनेक अंगांनी आणि मानवी मानसिकतेच्या स्तरावर पाहिले, तर गीता आपल्याला अधिक सखोल आणि सुंदर पद्धतीने उमजायला लागते. हळूहळू, ती केवळ एक धार्मिक ग्रंथ न राहता, आपल्याच अंतरंगाचा आरसा बनते.

गीतेच्या पहिल्या अध्यायात अर्जुनाच्या मनात निर्माण झालेला विषाद हा अनेकदा 'ईश्वरीय संकेत' किंवा 'डिव्हाईन विल' (Divine Will) म्हणून पाहिला जातो. परंतु, जे लोक केवळ विवेक आणि तर्काच्या (Rational Approach) आधारे याकडे पाहू इच्छितात, त्यांच्यासाठी अर्जुनाची ही अवस्था मानवी मनातील एक अत्यंत स्वाभाविक, मानसिक आणि भावनिक द्वंद्व आहे. चला, या परिस्थितीचे अत्यंत विवेकपूर्ण आणि आध्यात्मिक विश्लेषण करूया.

१. युद्धाची पूर्वतयारी आणि अर्जुनाचा सात्विक अहंकार

अर्जुन हा एक महान योद्धा आहे. त्याने युद्ध टाळण्यासाठी शांततेच्या प्रस्तावाला पूर्ण पाठिंबा दिला होता, पण मनात कुठेतरी 'युद्ध होणारच' ही जाणीवही त्याला होती. जेव्हा तो प्रत्यक्ष रणभूमीवर उभा राहतो, तेव्हा पहिल्या अध्यायाच्या २० व्या श्लोकात एक मोठा बदल पाहायला मिळतो: "अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः। प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पाण्डवः॥ हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते।"

याचा अर्थ असा की, जेव्हा कौरव युद्धासाठी सज्ज झाले होते आणि शस्त्रांचा मारा सुरूच होणार होता, अशा ऐनवेळी अर्जुनाने आपले 'गांडीव' धनुष्य उचलले आणि श्रीकृष्णाला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करण्यास सांगितले.

यानंतर २३ व्या श्लोकात अर्जुन म्हणतो: "योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः। धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः॥"

इथे अर्जुन 'दुर्बुद्धी दुर्योधनाचे प्रिय करू इच्छिणाऱ्या' लोकांशी लढायची इच्छा व्यक्त करतो. दुर्योधनाबद्दल त्याच्या मनात अजिबात आत्मीयता नाही, कारण तो चुकीचा आहे हे अर्जुनाला ठाऊक आहे. पण या श्लोकात एक अत्यंत महत्त्वाचा शब्द येतो— "वेक्षेऽहम्" (मी पाहू इच्छितो) की "माझ्याशी" लढण्यास कोण कोण सज्ज झाले आहे!

इथे अर्जुनाचा एक 'सात्विक अहंकार' दिसून येतो. "पांडव म्हणजे मीच, आणि या युद्धाचा प्रमुख सूत्रधार मीच आहे" ही भावना त्याच्या मनात डोकावते. हा अहंकार वाईट नसला, तरी तो एक प्रकारचा सूक्ष्म मोह निर्माण करणारा ठरतो.

२. परिस्थितीचे भान आणि नात्यांची ओळख

जेव्हा श्रीकृष्ण अंतर्यामी भाव ओळखून रथ भीष्म, द्रोण आणि जगातील सर्व राजांच्या समोर, म्हणजेच दोन्ही सैन्यांच्या अगदी मध्यभागी उभा करतात आणि म्हणतात, "पार्था, इथे एकत्र आलेल्या कुरुवंशातील लोकांना नीट बघून घे."

त्यानंतरच्या श्लोकात अर्जुनाची दृष्टी बदलते: "तत्रापश्यत्स्थितान् पार्थः पितृनथ पितामहान्। आचार्यान्मातुलान्भ्रातृन्पुत्रान्पौत्रान्सखींस्तथा॥ श्वशुरान्सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि।"

इथून अर्जुनाचे 'आयडेंटिफिकेशन' (अस्मिता किंवा ओळख) सुरू होते. आत्तापर्यंत त्याला समोर फक्त 'दुर्योधनाचे हितचिंतक' दिसत होते, पण आता त्याला तिथे आपले काका, आजोबा, गुरु, मामा, भाऊ, मुले, नातू, मित्र आणि सासरे दिसायला लागतात. शत्रूची जागा अचानक 'बांधवांनी' घेतली.

३. सात्विक अहंकाराचे मोहात आणि विषादात रूपांतर

जसा हा मानसिक बदल होतो, तसा अर्जुनाचा तो सात्विक अहंकार गळून पडतो आणि तिथे तीव्र मोहाचा जन्म होतो. २८ व्या श्लोकात तो स्पष्ट सांगतो: "दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्। सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति॥"

"हे कृष्णा, युद्धाच्या इच्छेने समोर उभ्या असलेल्या या 'स्वजनांना' (माझ्या लोकांना) पाहून माझे हात-पाय गळत आहेत आणि तोंड कोरडे पडत आहे."

इथेच अर्जुनाच्या विषादाचे खरे रहस्य दडलेले आहे. आत्तापर्यंत त्याला वाटत होते की तो अधर्माविरुद्ध लढत आहे, पण आता त्याला जाणवले की या युद्धात त्याला स्वतःच्याच हाताने आपल्या माणसांना मारावे लागणार आहे.

  • मी मारणारा आहे (अहंकार) + हे माझे लोक आहेत (मोह) = विषाद (दुःख)

हा जो मानसिक प्रवास आहे— 'माझ्याशी लढणारे' इथपासून ते 'माझेच नातेवाईक' इथपर्यंतचा— हा अर्जुनाला पूर्णपणे तोडून टाकतो. ज्या नातेवाइकांनी त्याच्या जडणघडणीत, त्याच्या आयुष्यात अमूल्य योगदान दिले होते, त्यांच्याशीच लढण्याचे सत्य समोर आल्यावर तो हताश होतो.

आपल्या वैयक्तिक आयुष्यातही अनेकदा असे मोहाचे आणि सात्विक अहंकाराचे क्षण येतात. जेव्हा आपण एखाद्या तत्त्वासाठी किंवा ध्येयासाठी लढायला निघतो, तेव्हा सुरुवातीला एक प्रकारचा आत्मविश्वास (किंवा अहंकार) असतो. पण जेव्हा त्या ध्येयाच्या आड आपलेच लोक, आपलीच जुनी बंधने किंवा आपलेच प्रिय विषय येतात, तेव्हा आपल्यातही असाच 'विषाद' निर्माण होतो.

हा विषाद वाईट नाही, तर ती एका मोठ्या परिवर्तनाची नांदी असते. जेव्हा माणसाला आपल्या मोहाची आणि अहंकाराची जाणीव होते, तेव्हाच तो खऱ्या अर्थाने 'शरण' जाऊ शकतो, जसा अर्जुन श्रीकृष्णाला गेला. म्हणूनच, गीतेचा हा प्रवास केवळ अर्जुनाचा नाही, तर आपल्या प्रत्येकाच्या मनातील द्वंद्वाचा आणि विवेकाचा प्रवास आहे.


भाग ११: अर्जुन, आई आणि मी आणि आईचा शेवटचा क्षण (Arjun and the Agony of Moral Duty)

मानवी जीवनाचा प्रवास हा एका अखंड युद्धासारखा आहे, जिथे प्रत्येक वळणावर माणसाला स्वतःच्याच मनाशी, विचारांशी आणि परिस्थितीशी लढावे लागते. या प्रवासात माणसाच्या मनामध्ये गोंधळ किंवा विषाद निर्माण होणे ही अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे. हा संभ्रम जगातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात कधी ना कधी निर्माण होतोच; फरक फक्त एवढाच असतो की, कोणाच्या आयुष्यात त्याचे प्रमाण कमी असते तर कोणाच्या आयुष्यात जास्त.

आता प्रश्न असा पडतो की, हा विषाद किंवा मनाचा प्रचंड गोंधळ नेमका परिस्थितीमुळे निर्माण होतो का? वरवर पाहता असे वाटते की बाह्य परिस्थितीच याला कारणीभूत आहे. परिस्थिती याला निश्चितच कारणीभूत असते, पण केवळ आणि केवळ परिस्थितीमुळेच विषाद निर्माण होतो, हे पूर्ण सत्य नाही. कारण, आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात अशा अनेक कठीण परिस्थिती येत-जात असतात. मग प्रत्येक वेळी प्रत्येक माणूस विस्कळीत का होत नाही? याचे मूळ कारण परिस्थितीमध्ये नसून, त्या विशिष्ट परिस्थितीशी झालेल्या आपल्या 'भावानिक गुंतागुंतीमध्ये' असते. ही केवळ साधी गुंतवणूक नाही, तर ती एक अत्यंत जटील 'गुंतागुंत' आहे. जेव्हा एकाच वेळी मनात अनेक सारे विचार एकमेकांमध्ये गुंततात – जे चांगले असतात, वाईट असतात, 'माझे' आणि 'परके' या द्वंद्वात अडकलेले असतात – तेव्हा खऱ्या विषादाचा जन्म होतो. या वैचारिक गुंतागुंतीमध्ये आपण किती अडकत जातो, हे पूर्णपणे आपल्यावर लहानपणापासून झालेल्या संस्कारांवर, मोठ्या लोकांनी आपल्याला आधी सांगितलेल्या गोष्टींवर आणि आजवर आपण घेतलेल्या अनुभवांवर अवलंबून असते.

या सर्व थोर व्यक्तींच्या बोलण्यातून अर्जुनाला हे स्पष्ट कळाले होते की, ज्या जुन्या व्यवस्था आणि जुनी माणसे आहेत, त्यांचा अंत या युद्धाद्वारे होणार आहे आणि न कळाले तरी, हे सर्व त्याला स्वतःच्या हाताने करायचे आहे. या युद्धात भीष्म, द्रोण, कर्ण अशा दिग्गज आणि प्रोमिनंट (प्रमुख) लोकांचा वध हा मुख्यत्वे अर्जुनाच्याच हातून होणार होता. यामुळेच अर्जुनाच्या मनातील भावनिक गुंतागुंत प्रचंड वाढली होती.

२. अर्जुन: जाणिवेचे शुद्ध रूप की सात्विक अहंकाराचा संभ्रम?

येथे आपण अर्जुनाच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार केला, तर अर्जुन हा 'One of the purest forms of consciousness' (चैतन्याचे एक अत्यंत शुद्ध रूप) आहे. तो अतिशय हुशार, बुद्धीमान आणि संवेदनशील माणूस आहे. तो कोणताही उथळ किंवा 'बंच अप' झालेला सामान्य माणूस नाही. तो अत्यंत नीतिमान आणि काही प्रमाणात धर्मपरायण आहे. तो आपल्या आयुष्यात केवळ तार्किक विवेकाने विचार करत नाही, तर 'नीती' या मूल्याला सर्वोच्च स्थान देतो.

परंतु, अशा उच्च दर्जाच्या अर्जुनामध्येही एक 'सात्विक अहंकार' दडलेला होता. हा सात्विक अहंकार असल्यामुळेच त्याच्या मनात हा संभ्रम आणि गुंतागुंत निर्माण झाली की, "हे सगळे मी करतो आहे... मी मारणारा आहे." अर्जुनाच्या मनात द्वंद्व निर्माण झाले:

  • मी युद्ध करणार, ज्यांच्यावर माझे नितांत प्रेम आहे त्यांच्याविरुद्ध शस्त्र उचलणार?
  • ज्यांचे माझ्यावर (अर्जुनावर) नितांत, निरागस प्रेम आहे, ज्यांनी माझ्या जडणघडणीत प्रचंड मोठे योगदान दिले आहे, अशा वयाने मोठ्या असणाऱ्या ज्येष्ठांच्या विरुद्ध मी उभा ठाकणार?
  • आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे युद्ध केवळ लढायचे नाही, तर हे 'मारण्याचे युद्ध' आहे! या युद्धात मृत्यू आहे, अंत आहे. आपल्या संस्कृतीत मृत्यू हा भाग अमंगल किंवा वाईट मानला गेला आहे. त्यातल्या त्यात स्वजनांचा (आपल्या माणसांचा) मृत्यू करणे आणि तोही स्वतःच्या हाताने, हे अर्जुनासाठी अतिशय अवघड आणि असह्य होते.

अर्जुन युद्धाला घाबरला होता का? तर अजिबात नाही. तो लढायला तयार नव्हता का? तो पूर्ण सिद्ध होता, त्याने स्वतः रणांगणावर येऊन शंखनाद केला होता. पण ऐन युद्धाच्या वेळी जेव्हा त्याला जाणीव झाली की, हे युद्ध विजय मिळवण्याचे नसून आपल्याच आजोबांचा (भीष्म) आणि गुरूंचा (द्रोण) 'वध' करण्याचे युद्ध आहे, तेव्हा तो कोसळला. जर या सर्व लोकांचा अंत अर्जुनाशिवाय इतर कोणा दुसऱ्याने केला असता, तर कदाचित अर्जुनाला इतका विषाद झाला नसता, तो इतका गोंधळला नसता. पण इथे तो स्वतःला 'कर्ता' समजत होता. "माझ्यामुळे हे घडणार, मला पाप लागणार, या युद्धाचा प्रमुख नायक मी आहे आणि मीच हा अंत करणार," या जाणिवेने त्याला ग्रासले होते.

कौरवांच्या बाजूने शंख फुंकणारे भीष्मांसारखे सेनानायक हे त्यांच्या सेनेचे कॅप्टन (सेनापती) होते. ते स्वतःच्या इच्छेने मरणार होते (इच्छाTarget), पण तरीही त्यांच्या मृत्यूला कारणीभूत नकळत अर्जुनच होणार होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पांडवांच्या बाजूने शंख फुंकणारा सुरुवातीचा नायक श्रीकृष्ण होता आणि त्यानंतर अर्जुन होता; परंतु हे दोघेही पांडव सेनेचे अधिकृत सेनापती नव्हते (पांडवांचे सेनापती धृष्टद्युम्न होते). व्यासांनी महाभारतात ही प्रत्येक गोष्ट अतिशय सूक्ष्म पद्धतीने मांडली आहे. अर्जुनाचे हे वैयक्तिक गुण, त्याची अतिशय भावविभोर अवस्थेत जाण्याची वृत्ती आणि थोर लोकांनी युद्धाचे सांगितलेले कुलक्षयाचे परिणाम – या सर्वांतून थॉट ऑफ द स्ट्रगल (संघर्षाचा विचार) हा ऍक्च्युअल स्ट्रगल (प्रत्यक्ष संघर्षापेक्षा) कितीतरी पटीने भयानक असतो, हेच सिद्ध होते.

परंतु, अर्जुनासाठी हे एक फार मोठे 'धर्मसंकट' होते. जेव्हा पितामह भीष्म आणि द्रोण यांच्यावर धर्मसंकट आले, तेव्हा त्यांनी दुर्योधनाच्या अन्नाचे ऋण फेडण्यासाठी अप्रत्यक्षपणे अधर्माची बाजू धरण्याचे ठरवले. पण जेव्हा अर्जुनावर धर्मसंकट आले – 'लढू की मारू?' – तेव्हा त्याने 'पलायनवाद' स्वीकारण्याचा प्रयत्न केला. त्याने धर्माची बाजूही धरली नाही आणि अधर्माचीही नाही, तो कर्तव्यापासून दूर पळू पाहत होता.

गीतेचा शाश्वत आधार

अर्जुनाचे कुरुक्षेत्रावरील धर्मसंकट असो किंवा माझ्या वैयक्तिक आयुष्यातील आईच्या निधनावेळची आणीबाणीची परिस्थिती असो; मानवी जीवनात जेव्हा जेव्हा अशा विषादाच्या, गोंधळाच्या आणि आणीबाणीच्या परिस्थिती निर्माण होतात, तेव्हा सामान्य बुद्धी काम करणे बंद करते. अशा वेळी केवळ स्वतःला 'कर्ता' समजून चालत नाही, तर फळाची अपेक्षा न ठेवता, मोहात न अडकता केवळ कर्तव्य कर्म करावे लागते.

जेव्हा जेव्हा आयुष्यात अशी कठीण वळणे येतात, तेव्हा 'श्रीमद्भगवद्गीता' हा आपल्यासाठी एक अत्यंत खंबीर आणि शाश्वत आधार बनते. ती माणसाला पलायनवादाकडून कर्तव्याकडे आणि संभ्रमाकडून विवेकाकडे घेऊन जाते. म्हणूनच, जीवनाचे युद्ध यशस्वीपणे लढण्यासाठी आणि मनातील विषादाचा समूळ नाश करण्यासाठी प्रत्येकाने गीता वाचली पाहिजे, समजून घेतली पाहिजे आणि आचरणात आणली पाहिजे.

भाग १२: अभ्यासाची पंचसूत्री आणि गीतेचे प्रयोजन / न्यूरोबायोलॉजिकल परिणाम (The Neurobiology of Arjuna’s Despair)

कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास करताना आपल्याला एका विशिष्ट क्रमाने आणि टप्प्याटप्प्याने जावे लागते. वक्त्यांनी लेखाच्या सुरुवातीलाच अभ्यासाची एक सुंदर पंचसूत्री मांडली आहे: १. अभ्यासाचे कारण, २. त्याचे स्वरूप, ३. त्याची पद्धती, ४. त्याचा परिणाम आणि ५. त्यातून मिळणारे निष्पन्न (Outcome).

भगवद्गीतेचा पहिला अध्याय, ज्याला आपण 'अर्जुनविषादयोग' म्हणतो, तो वास्तविक पाहता गीतेचा 'कारण अध्याय' आहे. अर्जुनाला विषाद का झाला? या कारणाचा शोध घेणे म्हणजेच मानवी मनाच्या सर्वात मोठ्या गोंधळाचा माग घेणे होय. गीतेचा अभ्यास केवळ श्लोकांचे पाठांतर किंवा त्यांचा वरवरचा अर्थ समजून घेणे नव्हे, तर तो एक सकळ आणि एकात्मिक दृष्टिकोन (Integrated Approach) ठेवून स्वतःच्या आयुष्याशी जोडून पाहण्याचा प्रवास आहे.

१. सायकॉलॉजिकल आणि सायकियाट्रिक विश्लेषण: तीव्र ताण आणि भीतीचा उगम

अर्जुनाची अवस्था ही केवळ एका योद्ध्याची भावनिक पडझड नव्हती, तर ती मानसशास्त्रीय परिभाषेत 'अ‍ॅक्युट स्ट्रेस' (Acute Stress), 'पॅनिक अ‍ॅन्झायटी' (Panic Anxiety) आणि 'फोबिक अ‍ॅन्झायटी' (Phobic Anxiety) चा सर्वोच्च बिंदू होती.

जेव्हा अर्जुन आपल्याच बांधवांना समोर पाहतो, तेव्हा त्याच्या मनात एक तीव्र भीती आणि प्रचंड ताण निर्माण होतो. मानसशास्त्राच्या दृष्टीने, जेव्हा मानवी मन अशा अनपेक्षित आणि भावनिक संघर्षाला सामोरे जाते, तेव्हा शरीराची मूळ सुसंवादिता (Harmony) बिघडून जाते. माणसाला जेव्हा असे वाटते की त्याच्या अस्तित्वावर किंवा मनावर खूप मोठे संकट आले आहे (जसे अचानक समोर आलेल्या काळ्याकुट्ट कोब्रा सापाला पाहून होते), तेव्हा मेंदू आणि अंतःस्रावी ग्रंथींमध्ये एक रासायनिक भूकंप होतो.

२. न्यूरोबायोलॉजिकल परिणाम आणि रासायनिक भूकंप

या भीतीमुळे मेंदूतील 'अमिग्डाला' (Amygdala) सक्रिय होतो आणि तो हायपोथॅलेमसला संकटाचा इशारा देतो. यामुळे मज्जासंस्थेमध्ये 'सिम्पेथेटिक मज्जासंस्था' (Sympathetic Nervous System) अत्यंत सक्रिय होते आणि शरीरात कोर्टिसोल (Cortisol) व अ‍ॅड्रिनालाईन (Adrenaline) या ताण निर्माण करणाऱ्या हार्मोन्सचा महापूर येतो.

  • न्यूरोट्रांसमीटरचा क्रॅश (Neurotransmitter Crash): कोर्टिसोल आणि अ‍ॅड्रिनालाईनच्या या पुरानंतर शरीरातील 'हॅपी हार्मोन्स' म्हणजेच सेरोटोनिन (Serotonin) आणि डोपामाइन (Dopamine) यांची पातळी अचानक खालावते. यामुळे मेंदूच्या मज्जापेशी (Neurons), ज्या शरीराला हालचाल करण्याचे संदेश देतात, त्या पूर्णपणे मंदावतात. यालाच वैद्यकीय भाषेत 'HPA Axis' (Hypothalamic-Pituitary-Adrenal Axis) चे असंतुलन म्हणतात.

३. शारीरिक आणि प्राणायामिक परिणाम (The Physical Manifestation)

या रासायनिक असंतुलनाचा (Chemical Imbalance) थेट परिणाम अर्जुनाच्या शरीरावर कसा झाला, याचे वर्णन गीतेच्या श्लोकांद्वारे (श्लोक २९ व ३०) अतिशय साहित्याभिमुख पद्धतीने केले आहे: "गात्रेची गळली माझी, होतसे तोंड कोरडे |" "शरीरी सुटतो कंप, उभे रोमांच राहती ||"

  • गात्रे सीदन्ति (स्नायू शिथिल होणे): मज्जापेशी मंदावल्यामुळे हातापायातील ताकद निघून जाते.
  • मुखं च परिशुष्यति (तोंड कोरडे पडणे): पॅनिक अ‍ॅन्झायटीमुळे लाळ ग्रंथींचे कार्य थांबते.
  • गाण्डीवं स्रंसते हस्तात् (हातातून धनुष्य निसटणे): स्नायूंचा ताबा सुटल्यामुळे पराक्रमाचे प्रतीक असलेले गांडीव हातात टिकत नाही.
  • त्वक्चैव परिदह्यते (त्वचेची आग होणे): रक्ताभिसरण विस्कळीत झाल्यामुळे संपूर्ण शरीराची आणि त्वचेची जळजळ होते.
  • भ्रमतीव च मे मनः (मन भ्रमित होणे): मेंदूकडील ऑक्सिजनचा पुरवठा असंतुलित झाल्यामुळे चक्कर आल्यासारखी अवस्था होते.

अर्जुन कृष्णाला म्हणतो की, मला आता इथे उभे राहणेही अशक्य आहे आणि मला सर्व चिन्हे विपरीत दिसत आहेत ('निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव'). हा माणसाच्या बौद्धिक आणि मानसिक क्षमतेचा झालेला संपूर्ण पराभव आहे.

४. आध्यात्मिक विवेक आणि थेरपी (Therapeutic Dimension of Gita)

समाजात भगवद्गीतेकडे पाहण्याचे अनेक दृष्टिकोन आहेत. कोणी त्याकडे पाप-पुण्याचे साधन म्हणून पाहतो, कोणी उच्चार शुद्धीसाठी, कोणी हिंदू धर्माचे प्रतीक म्हणून, तर कोणी संस्कृत शिकण्यासाठी. परंतु, गीता ही या सर्वांच्या पलीकडे जाऊन आपल्या आयुष्याशी 'को-रिलेट' (Co-relate) करण्याची विद्या आहे.

जेव्हा आपल्याला जीवनात विपरीत परिस्थिती येते, तेव्हा त्या परिस्थितीला नेमका प्रतिसाद कसा द्यायचा, याचे उत्तर गीता देते. भगवद्गीता ही एक 'थेरपी' (Therapeutic Science) आहे. पण ही थेरपी वरवरची किंवा तात्पुरती मलमपट्टी करणारी नाही, तर ती माणसाला 'नखशिखान्त' (Transformational Change) बदलून टाकणारी जीवनप्रणाली आहे.

ध्येयदर्शनाचा महामार्ग

आपल्या दैनंदिन जीवनात अर्जुनासारखा तीव्र आणि अक्राळविक्राळ प्रसंग रोज येत नसला, तरी त्याची छोटी-छोटी रूपे (स्मॉल स्ट्रेस) रोज येत असतात. जर आपण गीतेच्या माध्यमातून या छोट्या-छोट्या आघातांवर वेळीच उपाय करायला शिकलो, तर आपल्यात नैराश्याचा किंवा विषादाचा मोठा साठा (Accumulation) होत नाही.

जे लोग मानसिकदृष्ट्या सुदृढ आहेत, ज्यांना सध्या कोणताही त्रास नाही, त्यांच्यासाठीही भगवद्गीता अत्यंत महत्त्वाची आहे; कारण ती त्यांना 'ध्येयदर्शन' घडवते. स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणे आणि जीवनाला एका उदात्त ध्येयाकडे घेऊन जाणे, हाच या आध्यात्मिक विवेकाचा अंतिम गाभा आहे.

भाग १३: धोका आहे... आत्महत्या करू नका / विषाद आणि बुद्धी (Understanding Vishada and the Loss of Rationality)

धोका आहे... आत्महत्या करू नका....

अर्जुन विषाद झाला. विषादाचे कारण काय? तर सात्विक अहंकार आणि मोह यांच्या जोडीने विषादाची निर्मिती होते. आता विषाद झाला आहे, हे कळण्याचे मार्ग काय? तर विषाद झाला आहे, हे कळण्याचे मार्ग जो आहेत, ते आपल्या अस्तित्वावर त्याचा परिणाम व्हायला लागतो. म्हणजे माणसाच्या अस्तित्वावर जेव्हा एखाद्या गोष्टीचा परिणाम होतो ना, तो जास्त त्रासदायक असतो.

​माणसाचे पहिले अस्तित्व आहे शरीर, दुसरं अस्तित्व आहे प्राण, तिसरं अस्तित्व आहे मन, चौथं अस्तित्व आहे बुद्धी आणि पाचवं अस्तित्व आहे आनंद. याला 'फाईव्ह फोल्ड पर्सनालिटी' या 'पंचकोश' असेही म्हणतात. भृगू नावाच्या एका थोर ऋषीने आपल्या आयुष्याचे साठ वर्ष हे समजून घेण्यासाठी घातले आहेत. म्हणजे मानवी अस्तित्वाच्या 'फाईव्ह फोल्ड कन्सेप्ट्स' (पंचकोशात्मक विचार).

​विषादाची अवस्था ही जर पहिल्यांदा शरीरावर जर व्हायला लागली, अर्जुनाच्या बाबतीमध्ये 'सीदन्ति मम गात्राणि' असे पहिल्यांदा होतं. तोंडाला कोरड पडते. मग प्राणाच्या बाबतीत म्हटल्यानंतर श्वासोच्छ्वास वाढतो, हृदयाचे ठोके वाढतात, पोटात गोळा येतो, घाम फुटतो आणि मग तिसरं मनाच्या पातळीवर गेल्यानंतर भीती वाटायला लागते, अस्वस्थ वाटायला लागतं. 'भ्रमती व मे मन:' असं म्हटलेलं आहे. तो घाबरून जातो, अस्वस्थ होतो.

​पण सगळ्यात अवघड गोष्ट असते, ज्यावेळी विषाद हा बुद्धीला ग्रासतो. म्हणजे तीन पातळीवर ठीक आहे, असं अनेक वेळा आपल्या आयुष्यामध्ये घडत असतं. एखादी घटना घडते आणि या तिन्ही घटना, तिन्ही गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात. त्यावेळी आपण त्याच्याशी फाईट करतो किंवा पळून जातो. एखादा साप दिसला, तर साप दिसल्यानंतर त्याला आपण आयदर मारतो किंवा आपण पळून जातो. आता ज्या, इथे जर पाहिलं आपण, की तीन श्लोकांमध्ये गीतेच्या विषादाचं शरीरावर, प्राणावर आणि मनावरचा परिणाम दर्शविला आहे. या तीन श्लोकानंतरचे सगळे जे श्लोक आहेत, ते बुद्धीच्यावर झालेला परिणाम दर्शवतात.

​मी स्वतःचं ज्यावेळी अवलोकन करतो, त्यावेळी हा विषाद इतक्या छुपा मार्गाने आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या चित्तामध्ये दबा धरून बसलेला असतो, की तो पदोपदी आपल्याला आपल्या कर्तव्यापासून दूर नेतो. आपल्याला भ्रमामध्ये ठेवतो आणि आपली बुद्धी भ्रष्ट करतो. आता नेमकं समजून घेऊ की हा विषाद बुद्धीच्या पातळीवर गेल्यानंतर काय होतं. बुद्धीच्या पातळीवर गेल्यानंतर विषादाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडते, ती म्हणजे तुमचं जे चित्त आहे, त्या चित्तामध्ये भ्रम निर्माण होतो. चित्ताला मोहाचा भ्रम होतो. चित्त भ्रम होतो.

​आता हे चित्त भ्रम झाला हे कसं काय कळणार? तर पहिल्यांदा तुमच्या बुद्धीवरचा तुमचा ताबा संपतो. अर्जुन एक अत्यंत शूर, बुद्धिमान योद्धा आहे, पण युद्धभूमीवर भीष्म आणि द्रोणांना पाहून त्याच्या चित्ताला भ्रम झाला. त्यामुळे अधर्मी कौरव व स्वजन त्याला स्वजन वाटू लागले आणि त्यांचं पारिपत्य करणे त्याला अधर्म वाटू लागला. आणि जे सत्य आहे, त्याला असत्य वाटू लागतं. त्याला म्हणतात चित्तभ्रम. यालाच इंग्लिशमध्ये 'लॉस ऑफ रॅशनॅलिटी' (loss of rationality) असं म्हणतात.

​चित्तभ्रमाचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे माणूस स्वतःला चुकीचा मानत नाही, तो आपल्या भ्रमाचे समर्थन करण्यासाठी अतिशय हुशारीने तर्क लढवतो. तो स्वतःचाच शत्रू बनतो. आणि यातून काय निर्माण होतं, हे जे निदर्शक असतात, पण हे सगळं होतं ते म्हणजे भीती आणि आसक्ती (attachment), 'फिअर अँड अटॅचमेंट' (fear and attachment). ममता, माझेपण आणि भीती यात ते खरं तयार झालेलं असतं आणि त्याचे सगळे परिणाम आपल्याला लक्षात यायला लागतात.

​त्यामुळे मुख्यता पुढचे सगळे श्लोक जे आहेत, ते आपल्याला अर्जुनाचा बुद्धीवरचा ताबा सुटलेला आहे लक्षात येतं आणि तो स्वतःच्या चुकीच्या तर्काचं समर्थन करतो किंवा ज्ञान समजतो. आणि जे व्यवस्था परिवर्तन आहे, जे युग परिवर्तन आहे, ते मात्र थांबतं. मानवी आयुष्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये हा विषाद फार छुप्या रूपाने आपल्या बुद्धीमध्ये असतो. तो आपल्याला शोधता येत नाही, सापडत नाही, कारण आपण सतत माझं, मी याचा विचार करत राहतो, याच्या पुढे जात नाही. आणि तो कधी तुमच्या शरीराला, प्राणाला, मनालाही धक्का लावत नाही, तो डायरेक्ट थेट बुद्धीमध्ये इतका खोल जाऊन बसतो की हळूहळू तो तुमचा स्वभाव बनतो. विषाद हा तुमचा स्वभाव बनणं ही सगळ्यात मोठी टेन्शनची गोष्ट. मग तुम्ही पदोपदी चुकीचे तर्क करायला लागता आणि चुकीच्या तर्काला तुम्ही रॅशनलाईज करायला लागता.

​आता बघा इथे विषाद आहे आणि तो बुद्धीच्या पातळीवर आहे. इथे शरीराच्या पातळीवर व्यक्त नाही झाला, इथे प्राणाच्या पातळीवर व्यक्त नाही झाला, मनाच्या पातळीवर नाही झाला. तो फार छान जस्टिफिकेशन देतोय. जस्टिफिकेशन देणार, फार छान जस्टिफिकेशन देणार. आपलं चुकीचं असलं तरी पण आपल्या बुद्धीचा आधार घेऊन त्याला योग्य आहे असं सांगणार. मला पहिल्यांदा ते समजलं नाही की, माझे दोन दिवस त्याच्यामध्ये गेले. आणि दोन दिवसानंतर मला लक्षात आलं की अरे पण हे म्हातारपणातले कुठले १० वर्ष? म्हातारपणाच्या सुरुवातीचे १० वर्ष का शेवटचे १० वर्ष? का मधले १० वर्ष? आणि मी आता म्हातारा तर झालोतच. पण आता हे सुरुवातीचेच १० वर्ष जर गेले, तर लेकरांचं काय होणार आहे, घराचं काय होणार आहे, जबाबदाऱ्यांचं काय होणार आहे, कर्तव्यांचं काय होणार आहे? त्या व्यसनांच्या मोहापोटी आणि त्याच्यासाठी समर्थन करणं अशा त्या सात्विक अहंकारापोटी बुद्धी विषादाने ग्रस्त होते. आपल्या मनातला, आपल्यातला श्रीकृष्ण सतत जागा ठेवावा लागतो. कारण आपल्यामध्ये 'परमनंट' विषादाने स्थान आपण निर्माण केलेलं आहे, याला म्हणतात चित्तभ्रम, चित्त दूषित होणं. आणि चित्तशुद्धी करणं हेच आयुष्याचं ध्येय असतं.

भाग १४: स्वतः तयार केलेला व्हायरस स्वतःच्या सिस्टिम मध्ये (Arjuna’s Intellect: Purging the Self-Inflicted Virus)

स्वतः तयार केलेला व्हायरस स्वतःच्या सिस्टिम मध्ये

खरा अर्जुन किंवा कोणताही व्यक्ती हा सच्चित स्वरूप आणि आनंदमय असतो. तो 'चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम्' असतो. चिदानंद रूपी शिव असतो. इथे अर्जुन मात्र पळपुटा, भेकड, मोहाने ग्रस्त आणि सात्विक अहंकाराने त्रस्त आहे. त्यातूनच त्याच्या विषादाची निर्मिती झाली आहे. एखादा विषाणू (Bacteria किंवा Virus) शरीरामध्ये घुसल्यानंतर तो शरीराला त्रास देतो. प्राणामध्ये काही असंतुलन (Imbalance) निर्माण झाले, रक्तप्रवाहामध्ये अडथळे आले, रक्ताचे अभिसरण अव्यवस्थित व्हायला लागले, तर ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅक येतो. इन्सुलिनचे स्त्रवण व्यवस्थित होईना गेले, की डायबिटिज होतो.

मनाची हार्मोनी डिस्टर्ब करणाऱ्या गोष्टी वाढल्या, जसे की कॉर्टिसॉल हार्मोनसारख्या गोष्टी वाढल्या, तर मनाची अस्वस्थता वाढते. पण बुद्धीमध्ये जर व्हायरस गेला, तर तो काढावा लागतो. पण गंमत अशी आहे की, अर्जुनाच्या बुद्धीमधील व्हायरस बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीने घातलेला नाही, तर तो स्वतः अर्जुनानेच तिथे प्लेस-अप (रुजवला) केला आहे. आणि एकदा व्हायरस घुसला की सिस्टीम हँग होते, ती विचित्र वागायला लागते आणि स्वतःचे स्व-स्वरूप विसरते. तसाच अर्जुन हँग झालाय, त्याने स्वतःच स्वतःच्या बुद्धीमध्ये व्हायरस घुसवला आहे. आणि हा स्वतः घुसवलेला व्हायरस काढणे हे अतिशय जिकिरीचे काम असते; ते स्वतःला काढताच येत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या स्वतः घुसवलेल्या व्हायरसमुळे त्याला स्वतःचे स्वरूपच कळत नाहीये.

तो "मी, मी, मी" युद्ध करतो, "माझ्याविरुद्ध कोण लढतंय" असे म्हणतो. "माझा कुलधर्म, माझे कुल, आमच्या स्त्रिया" याच्यामध्ये तो इतका त्रस्त झाला आहे की विचारू नका. असेच होते, आपण आपले स्व-स्वरूप विसरलो की "मी, मी, मी" करायला लागतो.

अरे, कर्ता असणे हे काही तुझे स्व-स्वरूप नाहीये. तू जे काही कर्म करतोस, ती तुझी अभिव्यक्ती असू शकते, ते तुझे स्व-स्वरूप नाही. तू जे काही काम करतोस, जे काही लिहितोस, जे काही बोलतोस, ती तुझी अभिव्यक्ती असू शकते. अभिव्यक्ती नेहमीच शुद्ध असते असे नाही. त्यामुळे तुझे जे स्व-स्वरूप आहे—सच्चिदानंद स्वरूप—ते शुद्ध असते आणि ते आनंदमय असते. आपल्या स्वतःचे स्व-स्वरूप विसरणे म्हणजेच आनंदमय कोशाची अशुद्धी आहे.

आणि ही आनंदमय कोशाची अशुद्धी माणसाला स्थिर बसू देत नाही. आनंदमय कोशातील हा आनंद शरीराच्या पातळीवर, प्राणाच्या पातळीवर, मनाच्या पातळीवर आणि बुद्धीच्या पातळीवर—सगळ्याच पातळीवर घेता येतो. पण जर या चारही गोष्टींची हार्मोनी (सुसंवाद) असेल, स्थिरता असेल, तरच तो आनंद घेता येतो. अर्जुनाने स्वतःच्या बुद्धीमध्ये व्हायरस घुसवून स्वतःची हार्मोनी पूर्णतः नष्ट केली आहे, स्वतःचे समत्व गमावले आहे. तो असा विखुरला गेला आहे.

माणूस ज्यावेळी स्वतःचे स्व-स्वरूप विसरतो ना, तेव्हा तो तीव्र नैराश्यात जातो. तो तीव्र स्वरूपाच्या पॅनिक, फोबिक आणि ॲंग्झायटीमध्ये (Panic, Phobic & Anxiety) जातो. आता प्रश्न असा येतो की, स्वतःच निर्माण केलेला आणि स्वतःमध्येच इम्प्लांट (Implant) केलेला व्हायरस बाहेर कसा काढायचा? तो स्वतःलाच काढावा लागेल. आणि नुसता स्वतःलाच काढावा लागेल असे नाही, तर तो काढण्यासाठी सध्याच्या परिस्थितीत अर्जुन तयार नाहीये; त्यामुळे त्याला ईश्वरी मदत म्हणजेच कृष्णाची मदत लागणार आहे. म्हणूनच कृष्ण हा सखा आहे.

​भगवद्गीता अर्जुनाला त्याचे स्व-स्वरूप जसे दाखवते, तसेच आपल्यालाही आपले स्व-स्वरूप दाखवते आणि आपली बुद्धी अधिक शुद्ध करते. आपली देहबुद्धी जाऊन आत्मबुद्धी येते. आपण आपले देहस्वरूप विसरून आत्मस्वरूप अनुभवतो, म्हणजेच आपल्याला 'चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम्' हे कळायला लागते. आपला आनंद हा बाह्य गोष्टींवर अवलंबून न राहता आंतरिक गोष्टींवर स्थिर होतो. तो 'लॉ ऑफ डिमिनिशिंग' प्रमाणे कमी कमी होणारा न राहता, 'लॉ ऑफ इन्क्रीझिंग रिटर्न' (Law of Increasing Return) प्रमाणे सतत वाढत जाणारा राहतो.

विषादाने अर्जुनाचा ऱ्हास होऊन चित्त संकुचित झालेले आहे. त्याच्या चित्तामध्ये भ्रम निर्माण झाला असून चित्त भ्रष्ट होण्याच्या मार्गावर आहे, असे एकंदरीत पहिल्या अध्यायामध्ये दिसते.

भाग १५: जेव्हा मन रणांगण बनते (The Battlefield of the Mind: Analyzing Arjuna's Conflict)

जब मन रणांगण बनते

​भगवद्गीतेचा पहिला अध्याय, 'अर्जुन विषादयोग', हा केवळ एका युद्धाचे वर्णन नसून मानवी मनाच्या द्वंद्वाचा एक सखोल आरसा आहे. यातील श्लोक २८ ते ४६ पर्यंतचा प्रवास अर्जुनाच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीचे चित्रण करतो. अर्जुन इथे आपल्याबद्दल, आपल्या मनातील कोलाहलाबद्दल आणि त्याला पडणाऱ्या प्रश्नांबद्दल व्यक्त होत आहे. तो कसा विचार करतोय, त्याचे स्वतःचे तर्कशास्त्र (Logic) काय आहे आणि या सगळ्यात तो काय कृती करणार आहे, हे सर्व तो स्पष्टपणे मांडतो.

​या संपूर्ण प्रक्रियेत अर्जुन पळून जात नाही. 'युद्ध आता मी करणारच नाही' असे म्हणून तो पलायनवाद स्वीकारत नाही, तर तो आपल्या मनातील संघर्षाला तार्किक दृष्ट्या सामोरे जातोय. तो परिस्थितीला 'कॉन्फ्रंट' (Confront) आणि 'फेस' (Face) करतोय. जर तो पळून गेला असता, तर गीता ही निर्माणच झाली नसती. मात्र, प्रश्न असा निर्माण होतो की, तो या परिस्थितीला व्यवस्थित हाताळतोय का? अर्जुन हा क्षत्रिय आहे आणि हे एक 'धर्मयुद्ध' आहे. हे केवळ एका कुटुंबातील गृहयुद्ध नसून सत्य विरुद्ध असत्याचे युद्ध आहे, हे व्यासमुनी वारंवार सांगतात. तरीही अर्जुन याकडे केवळ गृहयुद्धाच्या चष्म्यातून पाहतो आणि 'स्वजन' या भावनेत अडकतो. तो या स्ट्रेसला बौद्धिक पातळीवर प्रतिकार करतोय, पण त्याच्या या विचारांमध्ये चुकीच्या धारणा आणि गृहितके (Assumptions) आहेत, ज्यामुळे त्याच्या मनात एक मोठा संघर्ष निर्माण झाला आहे.

​प्रत्यक्ष श्लोकांचा विचार करता, अर्जुन म्हणतो, "माझ्याच बांधवांना पाहून माझे हातपाय गळून चालले आहेत. माझे तोंड सुकत आहे, शरीराला कापड (परता) भरले आहे, कंप सुटला आहे आणि अंगावर शहारे येत आहेत. माझे गांडीव धनुष्य हातांतून गळून पडत आहे आणि त्वचेचा दाह होत आहे. माझे मन जणू भ्रमित झाले आहे." हे पहिल्या तीन श्लोकांतील आठ मुख्य मुद्दे अर्जुनाची हतबलता दर्शवतात. यानंतर तो म्हणतो, "मला सर्व चिन्हे विपरीत दिसत आहेत." ही विपरीत चिन्हे त्याला युद्धाच्या अनिष्टतेची जाणीव करून देत आहेत.

​इथे एक मोठा विरोधाभास (Paradox) दिसतो. ज्या श्रीकृष्णाला त्याने युद्धात आपल्यासोबत राहण्याची विनंती केली होती, त्याच कृष्णासमोर आता तो लढण्यास नकार देत आहे. स्वजनांना मारून कल्याणाची शक्यता त्याला दिसत नाही. त्याला विजय नको, राज्य नको किंवा सुखही नको. अशा राज्याचा किंवा उपभोगाचा तरी काय उपयोग? तो म्हणतो, "ज्यांच्यासाठी आपल्याला राज्य आणि सुख हवे आहे, तेच तर आज युद्धात प्राण पणाला लावून उभे आहेत. त्रैलोक्याचे राज्य मिळाले तरी मी त्यांना मारू इच्छित नाही." त्याला भीती वाटते की, स्वजनांना मारल्याने त्याला पाप लागेल.

​अर्जुन युद्धाच्या परिणामांचा विचार करताना म्हणतो, "लोभाने ज्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, त्यांना कुलक्षयामुळे होणारा दोष आणि मित्रद्रोहाचे पाप दिसत नाहीये. पण आपण तर बुद्धिमान आहोत, आपण या पापापासून मागे का हटू नये?" तो मांडतो की, कुळाचा नाश झाला की सनातन कुलधर्म नष्ट होतात, स्त्रिया दूषित होतात आणि वर्णसंकर निर्माण होतो. असा वर्णसंकर कुळाला नर्कात नेणारा ठरतो. श्राद्ध-तर्पण क्रिया बंद झाल्याने पितरही नर्कात पडतात. एकूण ३४ मुद्दे, चार प्रश्न आणि ठाम विधाने असलेला हा अर्जुनाचा संवाद आपल्या सर्वांच्याच मनात कधी ना कधी येणाऱ्या संभ्रमांचे प्रतिनिधित्व करतो.

​आपण पूर्ण अर्जुन कदाचित नसलो, तरी आपल्या आयुष्यात 'मिनी अर्जुन' तयार होत असतो. आपल्यालाही अनेकदा अशाच प्रकारच्या प्रश्नांना आणि संभ्रमाला सामोरे जावे लागते. म्हणूनच, हे प्रश्न अधिक मोठ्या परिप्रेक्ष्यात समजून घेणे गरजेचे आहे आणि त्यासाठीच हा भगवद्गीतेचा 'कारण अध्याय' अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

ऑडिओ पण ऐका!! आपल्याला पहिल्या अध्यायाबद्दल काय वाटते ते नक्की सांगा लिहून पाठवा किंवा ऑडिओ मेसेज करा पण नक्की करा प्लीज!!