इ.स. १००१
मध्ये मौहम्मद गझनीने भारतावर पहिल्यांदा आक्रमण केले व पंजाबचा
राजा जयपालचा पराभव झाला. इ.स. १००१ पासून सतत भारतावर अनेक आक्रमणे होत होती. या आक्रमणांची झळ भारतीयांना मोठया प्रमाणावर सहन करावी लागली. इ.स. १०२५ मध्ये मौहम्मद गझनीद्वारा सोमनाथ मंदिराची तोडफोड करून प्रचंड लुट केली. कुतुबुद्दिन ऐबक, चेंगीझ
खान, अल्लाउद्दिन खिलजी, महम्मद बिन तुघलक, तैमूरलंग, बाबर यांच्याशी लढताना अनेक शूरवीर
धारातीर्थी पडत होते. रयतेला तर प्रचंड मोठया प्रमाणावर अत्याचार सहन करावे लागत
होते. सतत ५०० वर्ष होणाऱ्या आक्रमणानी भारतवर्ष एका खोल गर्तेत जात होता. समाजात
अशा वेळी दुही,अंधश्रद्धा,लाचारी,गुंलामी अशा समाजविघातक गुणांचे साम्राज्य
लोकांमध्ये मोठ्याप्रमाणात दिसू लागते. ह्या पाचशे वर्षांच्या संघर्षाचा काळ १० तरी पिढ्यांनी सहन केला असेल. मला कधी
कधी खूप आश्चर्य वाटते की इतका संघर्षाचा काळ व अनेक अपयशाचे विष भारतीय समाजाने
कशाच्या बळावर पचवले असेल? अशी कोणती शक्ती सतत या पाशवी आक्रमणात आपल्याला
संजीवनी म्हणून मिळत होती?
प्रत्येक युद्धात सैन्य
लढते पण युध्य हरल्याने फक्त राज्यच जात नाही तर हरलेल्या समाजातील सर्वांचा आत्मविश्वास,
निर्भयता, स्वाभिमान पण जातो. असा सतत ५०० वर्षाचा काळ हा महाभयंकर होता. एखाद्या
देशाचे शकले- शकले झाली असती. असे काही भारताच्या बाबतीत घडलेले दिसत नाही.
“युनान,मिस्र,रोमा,सब
मीट गये जहाँसे
अब तक
मगर है बाकी नामो निशान हमारा
कुच
बात है के हस्ती मीट–ती नहीं हमारी”
Unaan-O-Misr-O-Roma Sab
Mit Gaye Jahaan Se
Ab Tak Magar Hai Baaqi Naam-O-Nishaan Hamaara
Ab Tak Magar Hai Baaqi Naam-O-Nishaan Hamaara
Kuchh Baat Hai Ke Hasti
Mit-Ti Nahin Hamaari
Sadion Raha Hai Dushman Daur-E-Zamaan Hamaara
Sadion Raha Hai Dushman Daur-E-Zamaan Hamaara
देशाच्या भविष्याचा विचार १९९७ ते १९९९ मध्ये करत होतो व
आसामच्या संरक्षण संशोधन प्रयोगशाळेत आम्ही व्यवस्थापन, भविष्यचिंतनासाठी
लागणाऱ्या अनेक प्रक्रियांचा अभ्यास करत होतो त्यावेळी SWOT analysis ची ओळख झाली. त्याचा उपयोग माझ्या मनातील प्रश्नांची उत्तर
मिळवण्यासाठी करता येईल का याचा वेध घेऊ लागलो. त्यावेळी भारतीय समाजाला घट्टजोडून
ठेवणारी ताकद कोणती यावर विचार करताना परत एकदा इतिहासाचा अभ्यास करायला लागलो.
वाचताना जाणवत होते या बाबत खूप चांगला आपला अभ्यास झालेला आहे. १९९४-९५ मध्ये
कन्याकुमारी मध्ये विवेकानंद केंद्राचा शिक्षार्थी म्हणून प्रशिक्षण घेत असताना अख्खा
महिनाभर आम्हाला दररोज दोन ते तीन तास याचा अभ्यास असे. कृष्णमूर्तीजी ज्यांना
आम्ही अण्णाजी म्हणायचो, ते आमचा भारतीय संस्कृती या विषयाचा अभ्यास करून घ्यायचे.
मूळ तामिळनाडू मधील अण्णाजी IIT पवईचे विद्यार्थी. विनोबा व जयप्रकाशजींचा खुपच
निकटचा सहवास त्यांना लाभलेला.त्यानंतर ते विवेकानंद केंद्रात जीवनवृत्ती म्हणून
कार्यरत झाले. अगदी वैदिक काळापासूनचा भारतीय संस्कृतीची ओळख अण्णाजी “Arise
Awake” या विवेकानंद्पुरम मधील सुंदर चित्र प्रदर्शनीच्या भवनात करून देत असत. त्यांच्या
दाक्षिणात्य हिंदीत बऱ्याच सत्रांचा शेवट करताना अण्णाजी आम्हाला बजावून सांगत,
“आप ये पक्का ध्यान में रखो भारत की शक्ती,भक्ती मे है.”
शक्ती आणि भक्तीचे समीकरण मला समजले
ज्यावेळी मी भारतातील भक्ती परंपरा व भारतावरील आक्रमणे यांचा समकालीन अभ्यास करू
लागलो त्यावेळी. एकीमध्ये शक्ती असते पण समजात ही एकी आणण्यासाठी भाव एक असावे
लागतात. प्रबोधिनीच्या प्रार्थनेच्या गद्य संकल्पात तर म्हटले आहे, “शिवछत्रपतींनी
सुद्धा हेच सांगितले आहे. दोन हृदये जर
एकत्र येतील तर संकटांच्या, पहाडांच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडतील.” (शिवरायांनी
मिर्झा राजे जयसिंग यांना लिहिलेल्या पत्राचा भावार्थ). या पाचशे वर्षाच्या
संघर्षाच्या काळात असे हृदये एकत्र आणण्याचे काम भारतातील संतांनी केले.
या पाचशे वर्षांच्या काळात सर्वं
भारतभर लोकांमध्ये भक्तीरसाची संजीवनी अनेक संतांनी संक्रमित केली. महाराष्ट्रात
महानुभाव व वारकरी संप्रदाय नामदेव- ज्ञानेश्वर ते तुकोबा तर पंजाबात गुरुनानकजी
तर पूर्वे कडे चैतन्य महाप्रभू, राजपुतान्यात मीराबाई-सुरदास तर दक्षिणेत
त्यागराजआदी संतांनी लोकांना भारतीय संस्कृतीच्या मूळ धारेशी बांधून ठेवले व
त्यातून लोकामनात एकीचे बंध पण बांधले गेले.
त्या भक्तीरसातून वीररस युक्त
शिवछत्रपती,गुरुगोविंदसिंग,राजा बुंदेला,लाचित बरफुकन( मिर्झा राजे जयसिंग यांचा
मुलगा रामसिंग व दिलेरखान पुरंदरच्या तहा नंतर आसामात लाचित बरफुकनशी लढण्यासाठी
गेले. लाचितचे प्रेरणा स्थान शिवराय होते असे म्हणतात) सारखे योद्धे निर्माण झाले.
ईशान्य भारत पण यास अपवाद कसा असेल.
इ.स. १४४९ मध्ये आसाम मधील नौगांव जिल्ह्यातील अली पुखरी गावात जन्म झालेले महान संत श्रीमद् शंकरदेव हे ईशान्य भारतातील भक्ती चळवळीचे अग्रणी
होते.
श्रीमंत शंकर देवांनी
ब्रह्मपुत्रच्या
मध्य
स्थित नदी द्वीप माजुली मध्ये सत्र आणि नामघरांची
सुरुवात केली. मातृभूमि ही सर्वात मोठी आई हा संदेश वैष्णवपंथीय श्रीमंत शंकर देवांनी
समाजाला दिला. संपूर्ण भारत एक आहे ही भावना त्यांनी लोकांमध्ये प्रबळ केली. कालांतरानी
त्यांनी सत्राना अध्यात्म, संस्कृति
आणि कर्म
संस्कृतिच्या केंद्रांच्या स्वरुपात विकसित केले.
युवक युवतींना खास प्रशिक्षण देण्यात आले. आपल्या भक्ती गीतातून नामसंकीर्तनातून
आसामात भक्तीचा मळा फुलविला. त्यांनी रचलेल्या नामसंकीर्तनात ब्रज और मैथिली
भाषेतील अनेक शब्द आहेत. शंकरदेवदर्शन मानणाऱ्या भक्तांना आयुष्यात एकदा तरी
वृदांवन यात्रा केलीच पाहिजे अशी श्रद्धा आहे.
मणिपुरच्या मैतेई बांधवांचे वृंदावन हे
पवित्र
तीर्थ स्थान आहे. अनेक भक्त मथुरा,वृंदावन
व द्वारकेला दर्शनासाठी जातात. गुवाहाटीवरून खास यासाठी एका रेल्वेची व्यवस्था
नियमित करावी लागली. मणिपुरी नृत्यातून खास कृष्णाच्या रासलीलांचे दर्शन होते.
मणिपूर मध्ये आपणास अनेक कृष्ण मंदिरे पहावयास मिळतात.
शंकरदेवदर्शनचे
अभ्यासक डॉ.
पीतांबर देव गोस्वामी हे तर म्हणतात आसाम मध्ये जोपर्यंत सत्र सक्रिय राहतील
, 'भावना'
जीवित राहील तोपर्यंत उर्वरित भारता
बरोबरचे संबंध
अतूट राहतील ते म्हणतात ईशान्य भारतातील लोक सांस्कृतिकदृष्ट्या भारतीय संस्कृतीशी
इतके एकरूप आहेत की त्यांना भारतापासून कोणीही तोडू शकत नाहीत.
परंतु या
भारतीय संस्कृतीचा व ईशान्य भारताचा काहीच संबंध नाही याचा
प्रचार करणारे व आपल्या बांधवांमध्ये फुटीरतेची भावना निर्माण करणाऱ्या परदेशी
शक्तींची व त्यांच्या हस्तकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ईशान्य भारत अशांत
ठेवणे हा त्यांचा मूळ उद्देश. मग सगळ्याच पद्धतीने त्यांचे प्रयत्न चालू असतात.
यासाठी विशेष प्रशिक्षण केंद्रे तेजपूर, मार्गारेटा, लखीमपुर,शिलॉंग सारख्या ठीकानी
उभा करण्यात आलेली आहेत. खास पगारी नौकर यासाठी नियुक्त केलेले असतात. त्यांच्या
प्रचाराचे विषय असतात,
१)
ईशान्यभागाचा व भारतीय संस्कृतीचा काही एक संबंध नाही. खोट्या इतिहास द्वारे
ईशान्यभाग हा भारतीय संस्कृतीचा भाग आहे अशा भाकड कथा मुद्दामून रचल्या गेल्या
आहेत.
२) भारतीय
संस्कृती व तुमचे काहीच एक नाते नाही. ही सगळी भारतीय लोक तुम्हाला धर्मांतरित करू
इच्छितात व मग तुम्ही त्यांच्यातील खालच्या जातीचे व्हाल. तुमच्या सगळ्या
गोष्टींवर त्यांचा अधिकार येईल. तुम्ही त्यांचे गुलाम व्हाल. असा विषारी प्रचार
गेले दोनशे वर्ष ही लोक करत आहेत.
या
फुटीरतावादी विषवल्ली बरोबरच या बांधवांचा आत्मसन्मान पण हाणून पाडण्याचा खूप
प्रयत्न केला जातो. तुम्ही लोक भूताची, पिशाच्यांची पूजा करता. तुम्हाला स्वतःचा
असा काही धर्मच नाही. तुमचा उद्धार व्हायचा असेल तर इतिहासात सत्य असणाऱ्या देवाला
शरण तुम्हाला जावे लागेल व तो धर्म स्वीकारला तरच तुम्हाला स्वर्ग सुख मिळेल.
तुमच्या संस्कृती मुळे तुम्ही मागास व दरिद्री राहिलेले आहात. आमच्या संस्कृतीचा
जर तुम्ही स्वीकार केला तर आमच्या सारखेच तुम्ही श्रीमंत व्हाल.
पश्चिमी
देशात प्रार्थनागृहात धर्म प्रचारक मिळणे आत्ता दुरापास्त होत आहे तर इकडे ईशान्य
भारतातून आपल्या या भोळ्या बांधवांना भोगवादी संस्कृतीची आमिषे दाखून
मोठयाप्रमाणावर जग भर त्यांना धर्म प्रचारासाठी पाठवणे खास करून दक्षिण पूर्व
देशान मध्ये मोठया प्रमाणावर सुरु आहे. यासाठी सर्वात जास्त काम करत आहेत ते केरळ
मधील मिशनरीज. प्रत्येक घरामागे एक जण तरी धर्म प्रसारासाठी ईशान्य भारतात येतो.
हे मिशनरी पण अनेक प्रकरची. आत्ता त्यांच्यातल्या त्यांच्यात पण स्पर्धा व तीही
पातळी सोडून.
पैसा,
सत्ता, स्त्रिया, शस्त्र,प्रसारमाध्यमे,मानवी हक्की संघटना या सर्वांचा वापर ही
लोक बेहुकुबीने करताना दिसतात. ईशान्य भागातील बांधवांना आपसात लढवायचे हे पण
मोठया प्रमाणात चालू आहे. देश अखंड ठेऊ पाहणारी कुठलीही संघटना ही कशी ईशान्य
भागातील बांधवांची शत्रू आहे हे खूप पद्धतशीर पणे पटून देण्याचे प्रयत्न चालू
असतात. याचे अनुभव अनेक वेळा आलेले आहेत.
१९७७ साली
गव्हर्नर के. ए. राजा या सच्च्या अरुणाचलप्रेमी ने ईशान्य भारतातील एकूण परिस्थिती
जाणून विवेकानंद केंद्राचे संस्थापक माननीय एकनाथजी रानडे यांना साद घातली की
अरुणाचल मध्ये शाळा सुरु करा. एका सच्चा देशभक्ताची साद दुसरा सच्चा देशभक्त ऐकणार
नाही असे कसे होईल? विवेकानंद केंद्राच्या शाळांची सुरुवात अरुणाचल प्रदेशात झाली.
आत्ता एकटया अरुणाचलात ३४ शाळांमधून १२०००च्या वर विद्यार्थी शिक्षण घेतात.
१९८७
मध्ये कुपोरीजोची शाळा सुरु झाली.कुपोजीरो मधील मुले खुपच लहान होती. त्यांची खूप
काळजी घावी लागायची. या काळजी पोटी बरेच नियम पण केलेले होते. बऱ्यापैकी शिस्तीवर
भर होता. सकाळी ५.३० वाजल्या पासून रात्री ९ वाजे पर्यंत अत्यंत विचारपूर्वक
दिनचर्येचे नियोजन केलेले असे. सुरुवातीस मुलांना थोडं अवघडच जात असे. मी म्हणणार
नाही अगदी आई वडिलांसारखी काळजी आम्ही लोक घेऊ शकत असुत परंतु त्यांना कुठलाही
परकेपणा किवा एकटे पणा जाणवणार नाही याचा प्रयत्न आम्ही सदैव करत असूत.
मुलांचे
आजारपण ही खुपच अवघड स्थिती. मलेरिया, जुलाबयानी त्रस्त अनेक मुलं असायची.मग
त्यांना काही प्राथमिक उपचार करून दापोरीजोच्या आरोग्य केंद्रात सायकलवरून न्यावे
लागे ते ही ८ किमी. कधी कधी तर रात्रीतून आजारी मुलांची परिस्थिती इतकी अवघड होई
की मध्यरात्री पण मुलांना घेऊन जावे लागे.
मुलींच्या शाळेत तर खुपच अडचणी असत
१९८०ला सुरु झालेल्या ताफ्रोगाव शाळेत मुली आजारी पडल्यावर १० किलोमीटर पर्यंत
मुलींना डोंगरातून कडेवर घेऊन तेथील जीवनव्रती मंदाताई व अपर्णाताई तेजू येथील जिल्हा
आरोग्यकेंद्रात घेऊन जायच्या. महिन्यातून तीन चार वेळा तरी असा अनुभव यायचा.
फक्त
आजारपणच नाही तर कधी कधी विंचू,साप,विषारी किडे मुलांना चावल्यावर पण खुपच धावाधाव
करावी लागायची. साथीचा आजार सुरु झाला की तर सगळ्या शिक्षकांना फक्त आजारी मुलांची
काळजी घेणे हेच महत्वाचे काम असे. वस्तीगृहाला रुग्णालयाचे रूप येई. पण फार क्वचित
एखादी अनुचित किंवा दुःखद घटना घडे.
दापोरीजो
मधील पावसाळ्यातील सकाळ. चहा घेत मी व जानिया बसलो होतो. तादो दुल्होम थोडा घाईतच अरुणज्योती कार्यालयात आला.
गडबडीतच व थोडया भेदरलेल्या अवस्थेत तो म्हणाला, “भैय्या, भैय्या कुपोरीजो स्कूल
में एक बच्चा मर गया.”
जानिया व
मी लगेच उठलो, “क्या बोलता है ?”
“सही में
भैय्या विकेवी में एक बच्चा मर गया अभि पुरे गाव में खबर है.” नेहमी मस्ती करणाऱ्या
बेदोच्या (तादो दुल्होम)बोलण्यावर आमच्या
दोघांचा विश्वास काही बसत नव्हता.
बेदोने
आईची शप्पथ घेऊन सांगितले की बातमी खरी आहे. आम्ही तिघाही मोटरसायकलवरून लगेच
कुपोरीजोला निघालो.शाळेत पोहोचतो तो तिथे पोलीस,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर लीगू
व अनेक लोक होते. आम्ही वस्तीगृहात पोहोंचलो तर अगदी पहिल्या कॉटवर एका मुलाचे शव
कपड्यांनी झाकून ठेवले होते. पंचनामा झाला होता. मुलगा २ऱ्या वर्गातील "तकार मच्चा" होता. त्याचे वडील मच्चा
बस्तीतून येण्यासाठी थोडा वेळ लागणार होता.
प्राचार्य
दिक्षित सरांनी मला सविस्तर माहिती दिली. मृत्यूचे कारण कळत नव्हते. शरीर काळेनिळे
पडत होते. लंबोदर हा मुळचा ओडीसातील वस्तीगृह प्रमुख खुपच भेदरून गेला होता.
रात्री तकारला अचानक थंडी वाजून कुडकुडी अंगात भरली. अंग पण गरम वाटत होते म्हणून
लंबोदरने नेहेमीची ताप कमी होण्याची क्रोसिन त्याला दिली होती. त्यांनतर तकार शांत
झोपला पण सकाळी सगळे मुले उठली पण तकार काही उठला नाही. लंबोदरने त्याच्या जवळ
जाऊन अंगाला हात लावला तर शरीर एकदम थंड. त्यांनी आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न
केला पण काहीच प्रतिसाद नाही. तो चांगलाच घाबरला. त्याने हात तकारच्या नाकाजवळ
नेला तर श्वासोच्छवास बंद तो पळतच दिक्षितसरांकडे गेला. सरांना तकारला पाहताच
कळायचे ते कळून गेले, सर्वं मुलांना दुसऱ्या वस्तीगृहात पाठवले. डॉक्टर लीगूनां
कळवण्यात आले ते लगेच रुग्णवाहिका घेऊन आले. त्यांनी पूर्ण तपासणी केली पण
मृत्यूचे कारण कळेना.थोडया वेळानी शरीर काळे निळे पडू लागल्यावर त्यांनी पुन्हा
पहिले पण काहीच समजेना. काहीतरी विषारी जीव चावला असावा असा प्राथमिक अंदाज काढला.
पोलिसांना निरोप पाठवला व तसेच तकारच्या पालकांना.
दुपार
पर्यंत तकारचे वडील आले. मृतदेह दापोरीजो मधील त्यांच्या भावाच्या घरी हलवण्यात
आला. इकडे लहान मुलांमध्ये खुपच भीतीचे वातावरण पसरले होते. त्यांना सावरण्याचा
सर्वं शिक्षक कसोशीने प्रयत्न करत होते. तकार खुप चांगला मुलगा पण थोडा खोडकर बाकी
अभ्यासातही चांगला होता. थोडी व्यवस्था लागल्यावर बेदो, जानिया व मी परत
दापोरीजोला निघालो. अंत्यविधी दुसऱ्या दिवशी होता. त्यामुळे आम्ही सर्वं जण
कार्यालयात परत आलो.
पुढच्या
आठवड्याला उद्योजकता प्रशिक्षण शिबीर घ्यायचे होते त्याचे बरेच काम बाकी होते ते
करत बसलो होतोत. सूर्य मावळतीला आला होता. एक कार्यकर्ता कार्यालयात आला व
म्हणाला, “वो मच्चा के लोग बहोत घुस्से में है उनका बच्चा मर गया न? ....वो विकेवी
को बहोत गाली दे रहे है ....वहाँ तो एक भी टीचर नही है न .....उनको बहोत बुरा लगा
वो बहोत गाली दे रहे है ......”
मराठी
भाषेत जशा शिव्या आहेत तशा शिव्या अरुणाचली भाषेत आजीबात नाहीत. वो लोक बहोत खराब
है, बेकार है ह्याच फक्त त्यांच्या शिव्या.
मी
मच्चांच्या घरी निघालो. जानिया व इतर कार्यकर्ते मला जाऊ देण्यास तयार नव्हते. त्यांना
समजून सांगितले. पण त्यांचे एकच म्हणणे, “सर मत जाओ, खतरा हो सकता है.”
“चलो फिर
आप सब लोग. वो लोग बी मेरे भाईही है न मुझे कुच्छ नही करेंगे ..” मी असे
म्हटल्यावर सगळेच जण माझ्या बरोबर निघाले. दहा बारा जण होतो आम्ही. आम्ही
मच्चांच्या घरी गेलो. तकारचा मृतदेह मधल्या खोलीत होता. नाकातून रक्त निघत होते.
शरीर बरेच काळे निळे झाले होते. मी गेल्यावर सगळे लोक शांतपणे माझ्या कडे पहात
होते. तकारच्या वडिलानी मला बसायला जागा करून दिली. आजूबाजूला बराच महिला वर्ग
होता. मी थोड्यावेळ बसून बाहेर आलो. दिक्षितसरांना पण येण्यासाठी निरोप पाठवला.
जानियाला
मी सांगितले, “ रातभर यहाँ ही रुकेंगे.”
त्याच्या
डोळ्यात थोडी काळजी होती. त्याने बऱ्याच कार्यकर्त्यांना बोलून घेतले होते. ते मला
कुठही एकटे बसू देत नव्हते. शेवटी मी घरासमोरील मोकळ्या जागेत अनेक जणांबरोबर
बसलो. जानिया व इतर १५ जण तरी माझ्या भोवती बसली. आमच्या जवळच शासकीय प्राथमिक
शाळेत शिक्षक असलेले रिद्धी सर व अनेक जण बसली होती. रिद्धीसरांकडे काही
दिवसांपासून दापोरीजोच्या चर्चमधील पास्टरचे येणे जाणे वाढले होते. तसे रिद्धीसर
कट्टर तागिन व विवेकानंद केंद्रावर प्रेम करणारे.
थोडे
चिडूनच ते मला म्हणाले, “ये ठीक नही हुंआ.”
मी पण मान
डोलावली.
“आप लोग
हमारे बच्चोंकी हिपासत ठीक नही करता.” सर थोडया अपांगच्या नशेतच बोलत होते हे लगेच
लक्षात आले.
“ऐसा नही
है सर, वो तो हमारे भी तो बच्चे ही है न ....” मी शांत पणे उत्तर दिले.
“नही
हमारे बच्चे, आपके कैसे हो सकते है? .....आप तो हिंदू है, हम लोग तागीन है, आप और हम
एक हो ही नही सकते ” रिद्धी सरांनी मला प्रति प्रश्न केला.
जानिया
चांगलाच अस्वस्थ झाला व म्हणाला, “भैय्या आप जरा बाहर चलो.”
मी त्याला
समजून सांगितले व बसवले.
“सर मै
हिंदू हूँ ये बात ठीक है पण मै दोनि पोलोको भी मानता हूँ न ?” समजावण्याच्या सुरात
मी प्रतिप्रश्न केला. आता अनेक जण जवळ जमा झाले होते.
रिद्धी
सरांचा आवाज पण आता चढला होता ते म्हणाले, “आप दोनि पोलोको मन से नही मानता. सिर्फ
आप उप्पर उप्पर बोल रहा है. आप हिंदू है और हम तागिन. आप लोक हमको हिंदू करने आया
है.”
आत्ता मात्र
मला पक्के समजले होते की हे काही रिद्धी सरांचे विचार नाहीत हा पास्टरचा करिष्मा आहे.
“सर, आप
ऐसा कैसे बोल रहे है.... आप दो सालोंसे प्रसाद भैय्या को जानते है कभी उसके बरातव
में जो आप बोल रहे है वैसे करते हुये या बोलते हुये देखा है क्या ?” न राहून
जानिया मध्ये बोलून गेला. तो माझ्या प्रत्येक गोष्टीचा प्रथमदर्शी साक्षीदार होता.
“नही सर
आप जो बोल रहे है वो तो मैने सपने में भी नही सोचा है ...आप सब मेरे भाई है....” मी
माझ्या मनातील भाव रिद्धीसरांसमोर व्यक्त केले.
“आप हमारे
भाई हो ही नही सकते आप हिंदू है और हम लोग अलग है .....” सरांचा आवाज आत्ता अधिक
आव्हानात्मक होत होता.
आप बोलरे है ना आप मेरे भाई है, और आप दोनि पोलो को मानते है, तो फिर आप गाय मास खायेंगे
क्या? जो हम लोग लोग खाते है ? रिद्धी सरांनी माझ्या समोर गाईचे मास खाण्याचे आव्हान
ठेवले.
आता सगळेच
जण शांत होते. मी क्षण भर विचार केला व उत्तर दिले, “क्यूँ नही जरूर खा सकता हूँ.”
“ए निजीर
थोडा गाय मास तो लेके आओ, सर को खाने के लिये,” जवळील एका मुलीला रिद्धी सरांनी
आवाज देऊन गाय मास केळीच्या पानात मागून घेतले.
सर्वं जण
खुपच शांत होते. मी गाय मास असलेले केळीचे पान हातात धरत सरांना म्हटले,
“सर, मै
खुदको सही साबित करणे के लिये ये गाय मास नही खा रहा हूँ.... बल्की मेरा एक बडा
भाई मेरे सच्चाई के उप्पर शक कर रहा है और उसका शक गलत हे ये सिर्फ मुझे ही नही
बल्की यहाँ के सब लोगोंको मालूम है और खास करके आपको तो यह सच पक्का मालूम है.आपके
मन में जो मेरे बारेमे भ्रम पैद्दा हुआ है उसको निकालाने के लिये ये मै खाऊगां ”
असे म्हणत मी माझा हातात गाय मास घेतले व खाणार हे पाहताच रिद्धी सर झटकन उठले व त्यांनी माझ्या हातातील गाय मास
हिसकावूनच घेतले व डोळ्यात पाणी आणून
म्हणाले,
“मत खाओ.... मै गलत हूँ.... मैने ऐसा नही बोलना चाहिये था.”
“मत खाओ.... मै गलत हूँ.... मैने ऐसा नही बोलना चाहिये था.”
रिद्धी
सरांनी मला मिठीत्त घेतले व ते धाय मोकून रडत होते मला पण रहावले नाही.....माझ्या
डोळ्यातून ही अश्रूंचा पाट वाहू लागला. आमच्या दोघांच्या मनातील निर्माण झालेली किलस्मिश
त्या शुद्ध भावांच्या अश्रूंच्या निर्झरात वाहून गेले.......
“शुद्ध
सात्विक प्रेम अपने कार्यका आधार है
प्रेम जो
केवल समर्पण, भाव ही को जाणता है
और उसमे
ही स्वयं की धन्यता बस मानता है
दिव्य ऐसे
प्रेम में ईश्वर स्वयं साकार है .....ईश्वर स्वयं साकार है”
९ टिप्पण्या:
प्रसाद सर धन्यवाद. जसजशी वाचत गेले तसतसं डोळ्यांसमोर सगळं उभं राहीलं. शेवटी तर डोल्यात पाणीच आलं. किती जण वाचताहेत तुमचा ब्लॉग हा प्रश्नच आहे.
धन्यवाद .....
किती जण वाचतात ....?
अपनेही मनसे कुच बोले क्या खोया क्या पाया जग में
मला असं म्हणायचं होतं की हजारो लोकांनी हे वाचलंच पाहीजे.
लोकं प्रतिक्रीया देत नाहीत याचं मला नवल वाटतं.
प्रसाद खरोखरच पूर्ण प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. तुझे अनुभव ऐकताना खरच प्रेरणा मिळते. धन्यवाद!
मी साडेतीन वर्षे अरुणाचलात होतो.विवेकानंद केंद्राने खरेच त्यांच्या भारतीयीकरणाचे खूप मोठे काम केले आहे.
प्रिय प्रसाद ,
तुम्ही सर्वांनी चालवलेले कार्य मोठे आहे ... राष्ट्रासाठी त्याग करून आपण हे कार्य करताय ... याचा आम्हाला सर्वांनाच अभिमान असेल.
मुस्लीम राज्यकर्त्यांनी समोरून वर केले .... मात्र ख्रिस्ती लोक पाठीवर वर करतायत.
संघटीत होऊन ... मुख्य प्रवाहाशी जोडले गेल्याशिवाय ... यावर उपाय होणार नाही.
ख्रीस्तीलोक तर केवळ उत्तर-पूर्व नाही तर संपूर्ण भारतभर धर्मांतर करण्यास प्रवृत्त आहेत.
याला साक्षात तेरेसाही अपवाद नाहीत. ह्या सर्वासाठी मुख्यत्वे अमेरिके मार्फत मोठ्या प्रमाणात "funding" मिळते. आणि त्यात आपले सरकार आहेच.
सध्याचा हिंदू समाज ज्या दिशेने मार्ग-क्रमण करत आहे ... त्या दृष्टीने एकूणच परिस्थिती चिंतेची आहे.
ह्याला तोंड द्यायला आपणच सर्वांनी एकमेकांना घट्ट धरून राहिले पाहिजे ...
समर्थ रामदास , विवेकानंद .. यांच्या कार्याचे आणि त्यांनी दर्शविलेल्या मार्गाचे अनुकरण करणे ... एवढे जरी केले तरी पुष्कळ परिस्थिती बदलेल.
आदित्य.
sir khupch changala experience sangitalat......... thanks
आत्मनिवेदन
मी मुद्दाम आत्मनिवेदन म्हणतो कारण आत्मनिवेदन ही जोडणारी प्रक्रिया आहे.
१) अनुभव घेणे म्हणजे शिकणे व हे अनुभव घेण्यासाठी संधी मिळाली की ते अनुभव, व्यक्ती बद्दल आदर निर्माण करतात. अर्थात व्यक्ती महत्वाची असते पण अनुभवाची संधी उपलब्ध करून देणारी व्यक्ती,समाज रचना व उद्दात हेतू घेऊन काम करणाऱ्या संघटना ह्या खऱ्या त्या आदरास प्राप्त आहेत. त्यांच्या मुळे ही संधी मिळत गेली.ते सर्वं माझ्यासाठी गुरु स्थानी आहेत.
२)इ.स.१००१ नंतर "परकियांशी लढताना आपल्या राजकीय सीमा आजच्याप्रमाणे नव्हत्या व शासनव्यवस्थाही सर्वत्र ज्याच्या त्याच्या होत्या. तेव्हा परकियांशी लढताना लोक कोणत्या बळावर लढत होते याचे उत्तर हे 'आपले आपले राज्य वाचवणे" हे सत्यच आहे. फक्त आपलेच राज्य वाचवणे, आपले सिहासन वाचवणे, आपल्या सुख सोयी वाचवणे. सैन्य पण आपल्याच राजासाठी लढते व राजा फक्त आपल्या प्रभाव क्षेत्राखाली असणाऱ्या सिमांतर्गत भागाचा विचार करतो. अर्थात त्याच्या निष्ठा सीमित व त्याच्या आत्महेतू पुरत्या होत्या.
३)माझ्या विचारा नुसार कलिंगाच्या युद्धानंतर भारतातील राज्यसत्त्ता ही खंड प्राय होत गेली व तिचे छोट्या छोट्या जनपदात रुपांतर झाले. दोन राज्यसत्तेतील संघर्ष वाढले व राज्यसत्तेतील सहकार्य कमी होत गेले.
४)भारतात राज्याचा सीमा वेगवेगळया असल्या तरी भारतीय लोक ज्या भावनेने जोडलेले होते त्या सीमा मोठया होत्या व त्या दोन राज्यातील सीमांना भेदून लोकसमुदायाला जोडून ठेवत होत्या. कारण लोकांच्या निष्ठा ह्या अधिक व्यापक होत्या.पण त्या सुप्त रूपात होत्या व बऱ्या पेकी त्यां पण विभाजित होत्या साहजिकच लोक पण एक नव्हते.
५)अशा परिस्थितीचा फायदा विस्तार आकांक्षा असणारा शत्रू नक्कीच घेणार. पण मुस्लिम आक्रमण फक्त राजकीय नव्हते ते धार्मिक व सांकृतिक पण होते. राज्यकर्त्यांनी ते फक्त राजकीय स्वरूपाचे आहे असे पाहिले व ते एकटे एकटे लढले किवा कधी कधी शत्रूला मदत पण केली.साहजिकच पराभव निश्चित होता. पराभावानंतर मात्र शत्रूच्या पाशवी अत्याचाराची झळ जनतेला पण बसू लागली.
६) भगवद्गीते मध्ये सांगितल्या प्रमाणे "यद्यदा आचरती श्रेष्ठ तत्त देवे इतरो जनः ......या उक्ती प्रमाणे समाजावर परिणाम हा जास्त बोले तैसा चाले अशा लोकांचा जास्त होतो. आपले संत सगळे या श्रेष्ठ ताकदीचे होते. त्यांनी लोकांच्या सीमित झालेया निष्ठाचे परीघ वाढवण्यास सुरुवात केली. अस्तित्वातील रेषे समोर मोठी रेष मारली व रेषेला छोटे केले. राजांच्या सीमाभेदून लोकमन एक होत गेले. पराभवा मुळे आलेले भय कमी होत समाज मन भयमुक्त करण्याचा प्रयत्न संतांनी केला. नाम कीर्तनातून त्यांनी लोकांना एक आणले व मोठया निष्ठांचे समाज मन तयार करण्याची व्यापक चळवळ उभी केली.
७)मला वाटते या प्रक्रियेत सर्वात जात अत्याचार सहन करणारी आई खंबीर पणे उभी राहिली. तिने कुटुंबाचे मन निर्भीड करावयास सुरुवात केली.यात जिजाऊ व महाराज उठून दिसतात. तानाजी व इतर नरवीरांच्या आईचे नाव माहित नाही ही अदृश्य मातृशक्ती स्वराज्य निर्मितीच्या मागे खंबीर पणे उभी होती.
ही परंपरा जपणाऱ्या जोपासणाऱ्या व वर्धिष्णू करणाऱ्या सर्वं गुरुना वंदन व साष्टांग नमस्कार ईश्वर रूपी देशाला
टिप्पणी पोस्ट करा