ती तशी मुळची भोपाळची. २५ दिवसांपूर्वी मी तिला भेटलो. अगदी एखादा तिराईत व्यक्ती जसा पाहील तसा. विवेकवाडी मध्ये बांधकाम चालू झाले त्या दिवशी. दोन बांधकामाचे तरुण गवंडी आले होते त्यांच्या बरोबर ती आली होती. मला थोडी विचित्र वाटले की दोन गवंडी आणि एक बाई. मग माल कोण कालवणार. वाळू कोण भरणार. सिमेंटची पोती कोण उचलणार.
तिचे वय पण फारसे दिसत नव्हते. मी थोड उशीराच गेलो होतो. तिने चक्क आपल्या हातात खोरे घेतले व माल कालवायास सुरुवात केली. ती एकटी बाई विटा देणे, माल देणे या सर्व गोष्टी करत होती.
हळूहळू तिला दररोज काम करताना पहात होतो, सकाळी ८ वाजता ती कामावर यायची व संद्याकाळी ६ वाजता तिचे काम संपायचे. मध्ये फक्त १५ मिनिटांची जेवणाची सुट्टी.
दुसऱ्या मजल्याचे काम सुरु झाले. मी वाटरिंग करून खाली येत होतो तो जिन्यामध्ये ती चक्क सिमेंटचे पोते आपल्या खांद्यावर घेवून येत होती. मला प्रचंड कुतूहल निर्माण झाले तिच्या बद्दल. आमचा बप्पा त्या दिवशी भेटायला आला होता. तो एक जबरदस्त शेतकरी. त्याने तिला सिमेंटचे पोते आणताना पहिले तर तो अवाक होऊन म्हणाला,
“दादा, ये पोत निदान पन्नास किलोचे असणार. ही बाई कसे काय उचलते हो. नुसती उचलत नाही तर जिना चढुन चक्क पोते आपल्या खांद्यावर आणते.”
सोबतचे गवंडी तिला बाजी म्हणायचे. “बा” म्हणजे बहिण. बाजी म्हणजे बहनजी. जसे जसे दिवस जात होते तसे बाजी बद्दल अधिक माहिती मिळत होती. ती शाळेत शिकायला नाही गेली. लवकर लग्न झाले व पहिली मुलगी पण आणि त्यांनतर एक मुलगी व दोन मुलं. मला हे कळल्यावर तर मी अवाकच झालो की बाजीच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले आहे व तिला दोन मुली आहेत.म्हणजे बाजी नानी आहे.
बाजीचे आयुष्य खूप कष्टाचे आहे पण दुर्दैवाने ते खूप अस्वस्थ करणारे पण आहे. तिचा नवरा हॉटेल चालवायचा भोपालला. चार मुलं झाल्यावर त्याने बाजीला सोडून दिले दोन वर्षांपूर्वी व दुसरे लग्न केले . बाजी अंबाजोगाईला आली. अंबाजोगाई तिचे मावशीचे गाव. दोन मुलं सोबत. काय करणार. तिचा मावसभाऊ गवंडी काम करायचा त्याच्या सोबत बाजी काम करायला लागली. काम करता करता ती बऱ्याच गोष्टी शिकली. बाजीला आता बाईचा रोज नाही तर गड्याचा रोज मिळतो, दिवसाचे तीनशे रुपये.
बांधकामाचा काल शेवटचा दिवस होता. बाजी चा मुलगा पण सोबत आला होता. त्याला अजून एक मोठा भाऊ. दोघ पण शाळेत जात नाहीत. मी विचारल्यावर बाजी म्हणाली, मी सकाळी ८ पर्यंत यांना तयार करते. जेवण करून ठेवते. पण मी कामावर गेले की हे पोर शाळा बुडवतात. काय करणार. काम तर करावेच लागणार.
मी गेल्या पंचेवीस दिवसात बाजीला एकदाही सुकलेल्या चेहऱ्याचे पाहिले नाही. थकलेले पाहिले नाही आणि फक्त एक दिवस सुट्टी. मी सहज तिचे वय विचारेल...असेल ३५- ४०. बाजी मर्द बाई आहे. तिच्या श्रमाने आपली प्रबोधिनीची इमारत उभारली याचे खूप समाधान वाटते. मी शेवटी जाताना बाजीचा फोटो घेतो म्हणालो. ती म्हणाली, “ काय या विचित्र अवतारात घेणार का ?”
ती कशी आहे या पेक्षा बाजी एक मर्द बाई आहे हे मात्र मनोमन पटले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा