शुक्रवार, ९ नोव्हेंबर, २०१२

अरुणाचलप्रदेश ६:-विस्तार है अपार ..प्रजा दोनो पार..करे हाहाकार ...


निसर्गाच्या सृजनाचा अविष्कार फार सुंदरपणे व मुक्तपणे व्यक्त झालेला आपल्याला ईशान्य भारतात पहावयास मिळतो. तिथले लोकजीवन पण असेच मोकळे चाकळे. अशा सुंदर निसर्गाचा व लोकजीवनाची नाळ स्थानिक लोकांची तुटणे अशक्यच. अरुणाचल प्रदेशातील अनेक बुद्धिमान विदयार्थी शिक्षणासाठी अन्य राज्यात जातात. तिथे चांगले शिक्षण घेतात. चांगल्या पगाराची नौकरी त्यांना महानगरातील मोठया उद्योग समूहात सहज मिळू शकते. शहरातील मोहजाल मात्र ते अडकून न राहता ते अरुणाचल मध्ये परततात.

एका दृष्टीने अरुणाचलच्या विकासासाठी हे खूप चांगले आहे. पण एकंदरीत अतिशय कमी लोकसंख्या असलेल्या या प्रदेशात रोजगाराची उपलब्धतता पण कमी. यातून अनेक सुशिक्षित तरुण सुंदर स्वप्न घेऊन परततात खरे पण कधी कधी त्यांची निराशा होते. साहजिकच असे सुशिक्षित तरुण भक्ष बनतात देश विघातक कारवाया करणाऱ्या संघटनांचे. दुसरी अजून एक गोष्ट घडते ती ही की संपूर्ण भारताशी त्यांचे नाते तितकेशे ताकदवाण बनत नाही. फक्त शिक्षणासाठी जायचे व परत यायचे एवढ्या पुरता त्यांच्या सहवास. संपूर्ण देशाच्या विविधतेशी,तेथील प्रश्नांशी, विविध सामाजिक विकासाच्या बदलांच्या प्रक्रीयांशी त्यांचे नाते निर्माण होत नाही. राज्यापासून देशापर्यंतचे भावनाचे, अनुभवांचे त्यांचे क्षितीज वाढत नाही.

खरे पाहता एकूणच ईशान्य भागात अन्य राज्यातून रोजगारासाठी येणाऱ्यांची संख्या बरीच जास्त. सुशिक्षित,बेरोजगार व शिकत असताना काही कटू अनुभव घेतलले या जवान पोरांमध्ये अन्य राज्यातून आलेल्या बांधवान प्रती अनेक गैरसमज नवनिर्माण करणारी राजशाही या भागात आपले पाळे मूळे सहज घट्ट करते. अन्य राज्यात अशी राजशाही फक्त प्रादेशिक अस्मिता वाढवते पण ईशान्य भागात या राजशाहीचे साटेलोटे परदेशी एजन्सीजशी असल्याने ही प्रादेशिक अस्मिता पुढे फुटीरवादी व आतंकवादी होते.

खरे पाहता भारताच्या अन्य राज्यातून जाणाऱ्या बंधूनी आपल्या आचरणाद्वारे आपण दुधातील साखर आहोत हे दाखून द्यायला हवे पण आपले प्रचलित संकुचित शिक्षण पद्धतीत तयार झालेली ही बाबू मंडळी स्थानिक लोकांना झारीतील शुक्राचार्य किंवा लुटारू वाटायला लागतात. त्यात मुंबई,पुणे व बंगलोर मध्ये घडलेल्या काही महिन्या पूर्वीच्या घटना अधिकच अस्वस्थता निर्माण करते.

व्यक्ती मधील अभिजात पुर्णत्वाचे प्रगटीकरण म्हणजे शिक्षण. हे अभिजात पूर्णत्व प्रगत व्हायचे असेल तर व्यक्तीला आव्हाने घेत अभिव्यक्त होता आले पाहिजे. पण प्रचलित शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांना फक्त स्पर्धेत बक्षीस मिळवण्यापुरते अभिव्यक्त व्हायला शिकवते व अनेक शिकवण्या लावत चांगले गुण घेऊन बडया प्याकेजची नौकरी मिळण्यासाठीची आव्हाने घ्यायला शिकवते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे जीवन खुपच आत्मकेंद्रित व संकुचित बनवते. खरे पाहता सभोवतालच्या जेष्ठ व्यक्तींचे वागणे हे विद्यार्थ्यांसाठी आव्हाने घेत अभिव्यक्त होण्यासाठी मार्ग दर्शक असले पाहिजे.

माझी विचारधारा ही माझ्या जगण्यासाठीचा विचार आहे फक्त पुस्तकी 

पांडित्य नव्हे त्यामुळे लोकांवर बौद्धिक कसरती करत प्रभाव टाकण्याचा 

विषय तो असूच शकत नाही. मी दैनंदिन कसे जगतो यातूनच माझी 

विचारधारा लोकांना समजली पाहिजे. माझे जगणे त्यांना आवडले तर ते मी 

ज्या विचारधारेचा पाईक आहे ती ते मनापासून स्वीकारतील व त्या प्रमाणे 

जगण्यास सुरुवात करतील. आपण जगत नसलेली विचारधारा फक्त बोलण्या 

लिहिण्या पुरती मांडणे म्हणजे आपण फक्त बोलके पोपट आहोत असे नाही 

का ? 


या सर्वातून मला एक खूप चांगली गोष्ट जमायला लागली मी कुण्या एका 



व्यक्तीचा वा व्यक्ती समूहाचा वा विचारधारेचा द्वेष न करता त्यांच्याकडून 



माझे जगणे अधिक समृद्ध होईल यासाठीचे तंत्र व मंत्र मिळवत जातो व 



सर्वंजणांशी मैत्र होण्यास मदत होते. 

        
अभिव्यक्तीचे चांगले मार्ग आव्हाने देत विकसित करण्याची वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित करता येणे हे चांगल्या शिक्षकाचे लक्षण आहे. ते शिक्षक विद्यार्थ्यांसाठी प्रेरक व आदर्श पण ठरतात व ताकदवान व आकाशाला गवसणी घालणाऱ्या विद्यार्थ्यांची पिढी यातून निर्माण होते.

ईशान्य भारतात अशा प्रकारची मुहूर्तमेढ १९२४ मध्ये स्वामी विवेकानंदांच्या जीवन विचारातून प्रेरणा घेणाऱ्या स्वामी प्रभानंदानी मेघालयातील चेरापुंजीला रोवली. फक्त ३८ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या स्वामी प्रभानंदाचे आयुष्य इतके अनुकरणीय व प्रेरक होते की त्यातून रामकृष्ण मिशन,शारदा मिशन व विवेकानंद केंद्राच्या शैक्षणिक कार्याचा ब्रम्हपुत्र आज ईशान्य भारतात वाहू लागला. अरुणाचल प्रदेशात तर असे एकही गाव नसेल की तेथिल विदयार्थी विवेकानंद केंद्राच्या अथवा रामकृष्ण मिशनच्या वा विद्याभारतीच्या शाळेत शिकलेला नसेल.

“बालीजान” आसाम अरुणाचलच्या सीमेवर असलेले एक छोटे गाव. इटानगर-तेजपूर महामार्गावर उतरून १४ किलोमीटरचा पायी प्रवास, सोबतीला आसाम मधील छोटी,सुंदर मातीने सारवलेली घरे व त्याभोवती नेटक्या जपलेल्या भाजीपाल्याच्या बागा पाहत व मध्ये मध्ये सोबतच्या पार्ले जींचा आस्वाद घेत मी निघालो बालीजानच्या विवेकानंद केंद्र विद्यालयाकडे. माझे त्यावेळी वय होते २५ वर्षे. त्यामुळे चांगलाच उत्साह व रग होती. दोन तासात न थांबता मी दहा किलोमीटर पार केले. आता सोबत सुरु होती हिरव्यागार चहा बागांची. चहा बागांमधून चालण्याचा आनंद काही औरच असतो

 त्यातल्या त्यात सोबतच्या वाक्मनवर हेडफोन लाऊन भूपेनदांच्या आवाजातील 

 'एक कली दो पत्तियां, नाजुक नाजुक उंगलियां' एकत चालणे.

एक किलोमीटर चालून झाल्यावर भूपेंदाचे दुसरे गाणे सुरु झाले ...
विस्तार है अपार.. प्रजा दोनो पार.. करे हाहाकार...
निशब्द सदा, ओ गंगा तुमबहती हो क्यूँ ?

नैतिकता नष्ट हुईमानवता भ्रष्ट हुई,
निर्लज्ज भाव से बहती हो क्यूँ ?

इतिहास की पुकारकरे हुंकार,
ओ गंगा की धारनिर्बल जन कोसबल संग्रामी,
समग्रोग्रामी,बनाती नहीँ हो क्यूँ ?

विस्तार है अपार ..प्रजा दोनो पार..करे हाहाकार ...
निशब्द सदा ,ओ गंगा तुमबहती हो क्यूँ ?

अनपढ जनअक्षरहीनअनगिन जन,
अज्ञ विहिन नेत्र विहिन दिकमौन हो क्यूँ ?
इतिहास की पुकारकरे हुंकार,
ओ गंगा की धारनिर्बल जन कोसबल संग्रामी,
समग्रोग्रामी,बनाती नहीँ हो क्यूँ ?

विस्तार है अपार ..प्रजा दोनो पार..करे हाहाकार ...
निशब्द सदा ,ओ गंगा तुमबहती हो क्यूँ ?


व्यक्ति रहेव्यक्ति केन्द्रितसकल समाज,
व्यक्तित्व रहित,निष्प्राण समाज को तोड़ती न क्यूँ ?
इतिहास की पुकारकरे हुंकार,
ओ गंगा की धारनिर्बल जन कोसबल संग्रामी,
समग्रोग्रामी,बनाती नहीँ हो क्यूँ ?

विस्तार है अपार ..प्रजा दोनो पार..करे हाहाकार ...
निशब्द सदा ,ओ गंगा तुमबहती हो क्यूँ ?
( रचना- पंडित नरेंद्र शर्मा ) 

ही रचना माझ्या मनात सदैव्य हाहाकार निर्माण करते. तोच हाहाकार घेऊन मी शाळेत पोहोंचलो. बालीजानची ही शाळा आठवी ते दहावी पर्यंतची. अरुणाचलच्या अनेक भागातून मुले इथे शिक्षण घेण्यासाठी यायची.






यात मुख्यतः निशी बांधव जास्त. लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात जास्त लोकसंख्या ही अरुणाचलात निशी बांधवांची. निशी हे अरुणाचलप्रदेशचे योद्धे व लढवय्ये. प्रचंड श्रम करण्याची ताकद त्यांच्यात आहे.







मी पोहचेपर्यंत संध्याकाळ झाली होती. सायंकाळी काही मुले फुटबॉलच्या मैदानावर तर काही व्यायामशाळेत तर काही मुले शाळेच्या समोरील मोकळ्या रस्त्यावर फेरफटका मारत होती. मी पण त्यांच्या सामील झालो. थोडे अंतर पार करताच एक मुलगा थोडे वेगानी चालत माझ्याकडे आला व नमस्ते म्हणत माझ्या बरोबर चालू लागला.

“सर, कहासे आये हो ?”

“महाराष्ट्रसे”

“नये टीचर है आप ?”

“नही,पहले अरुण-ज्योतीका काम करता था अब VKSPV मे Education officer हुं”

“याने आप लाईफवर्कर है न सर ?”

मुलगा बोलण्यात चुणचुणीत वाटत होता. मी त्याला विचारले,

“आपका नाम क्या है ?”

“जोराम बेदा, इटानगर से हूँ”

 बेदा ने मला अनेक प्रश्न विचारले. माझ शिक्षण ऐकूण तो थोडा स्तिमित पण झाला. रात्रीच्या जेवणा नंतर बेदा व त्याचे अनेक मित्र भेटण्यासाठी परत आले. आमची जोरदार चर्चा सुरु झाली.चर्चा भर रंगात आली असताना अन्य राज्यातून अरुणाचल मध्ये नौकरीसाठी आलेल्या लोकांबाबत बेदाने आक्षेप घेतला. तसे हे माझ्या सवईचे झाले होते.

मी आता मात्र बेदाला आव्हान देत म्हंटल,

“अरे भाई आप भी तो थोडा हिंम्मत करके बाहर के राज्य मे काम करना सिखो. थोडा भारत और समझ मे आयेगा. चलो लगाता है क्या शर्थ ? आप पद्धाई के बाद अन्य राज्य मे काम करेंगे?”  

बेदा शांत बसला.

रात्र बरीच झाली होती. आम्ही सर्वानी एकमेकांचा निरोप घेतला.त्या दिवसी पासून बेदाशी मैत्री पूर्ण नाते वाढत गेले.१९९७ च्या दहावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयात तो पहिला आला. अकरावी विज्ञानसाठी त्याने रामकृष्ण मिशन,नरोत्तम नगर मध्ये प्रवेश घेतला. या काळात मी त्याला भेटन्यासाठी नरोत्तमनगरला जाऊन आलो.

जोराम कुटुंबाचे व विवेकानंद केंद्राचे नाते पण या काळात अधिक दृढ झाले.बेदा चे वडील विवेकानंद केंद्राच्या अरुणाचल शाखेचे प्रमुख म्हणून काम पाहू लागले.१९९९ला मी महराष्ट्रात आलो व बेदाशी संपर्कच थांबला. पुढे तो  १२ वीला वैद्यकीय अभ्यासक्रमाचा प्रवेशपरीक्षेत तो राज्यतून पहिला आला.
बेदाशी संपर्क जरी नसला तरी माझे अरुणाचलातील केंद्राच्या कार्यकर्त्यांशी संपर्क होता. या वर्षी मी अरुणाचलवर लिहायला सुरुवात केल्यावर गौरी ताईचा फोन आला.
तीने खूप उत्साहाने विचारले,

“दादा,तू जोराम बेदाला ओळखतोस न ?”  

“हो”

“अरे तो IAS अधिकारी झाला. त्याने खास एक उल्लेख केला की माझ्याशी सरांनी शर्यत लावली होती की तू अरुणाचल सोडून इतर ठिकाणी काम करून दाखव. त्याने होम क्याडर न घेता पंजाब क्याडर घेतले. ती पुढे म्हणाली तो म्हणाला

“वो सर ने हमे challenge किया था न ! बाहर काम करके दिखाओ...देखा हम पंजाब मे काम कर रहा है !”

“हो ताई मी लावली होती शर्यत त्याच्या बरोबर.”



१५ वर्षान पूर्वीचा जोराम बेदा मी आठवत होतो. जग इतके जवळ आलेले आहे की गुगल सर्च इंजिनवर जोराम बेदा लिहिले व त्याबद्दल अधिक माहिती मिळाली व संपर्काचा पत्ता व दूरध्वनी क्रमांक.

खूप आनंद झाला. मी त्याला एक मेल लिहिला.

On Fri, Jun 8, 2012 at 3:34 PM, Prasad Chikshe <prasadchikshe@gmail.com> wrote:

Dear Beda

Writing u after long time. Remembering charming Beda in Balijan and some time a evening walk on the road in front of school. That time I was Education officer of VKV. Still remember 1997......RK mission Hall at Itanagar and flying visit to Narottamnagar while way back to VKV Niusa.

How are u ? Heard from Rupeshji that u still remember my challenge to all ur batch mate to work in other state. I really feel proud that u proved ur spirit by making it in to the action.

Best Wishes....!!!

Prasad



त्यांतर यावर त्याचे उत्तर आले.


On Sun, Jun 24, 2012 at 8:50 PM,
Joram Beda <zbedaa@gmail.com> wrote:

Respected Sir,

I do remember you. Well, the challenge was worthwhile. I've come a long way now.

Swami Vivekananda was surely an inspiration for us but you people were the REAL inspiration.

I have joined IAS Punjab cadre and working as ADC Moga district and Joint Commissioner, Moga Municipal Corporation.

Life in VKV was tough and now all that has helped me survive all odds! I am doing good by God's grace. Hope to see you sometime.

Regards,

Dr. Joram Beda, IAS.
.


आपल्या शिक्षकांबद्दल बेदा आपल्या ब्लॉगवर लिहतो ....

Yes, my most respected teachers you have made that difference. That difference is what we all are today. A generation of people from Arunachal Pradesh have benefited from your endeavors and your sacrifices. This write up is an ode to that crack team of young men and women who braved the predator ridden thick forests of Arunachal Pradesh to establish schools and educate the rural rusty children and what fine gentlemen and ladies you have transformed them into. We do salute the contribution of the likes of Sardar Vallabhbhai Patel and Netaji Subash Chandra Bose in making this nation but personally I will give you a higher salute for the silent revolution that you all initiated in this forgotten tribal populace of the remote far-east corner of India. Your contributions are mightily commendable and will be etched in the history of Arunachal Pradesh for ever.  




   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: