फेसबुक वरील "इवलासा
वेलू "काव्य संग्रहाचे उत्साहात प्रकाशन --
एका आगळ्या वेगळ्या प्रयोगाची ही बातमी . फेसबुक वर हजारो गट/ समूह आहेत, त्या वरच्या निष्फळ चर्चा आणि विकोपाची भांडणे ,किंवा इंटरनेट चे व्यसन या नकारात्मक गोष्टींच्या पार्श्व भूमी वर ही बातमी मनाला आशेचे पंख बहाल करते.एका अशाच ई -समूहावर जवळपास १८ कवी ,काही चित्रकारांनी एकत्र येऊन एक स्वप्नं बघितलं ,कवीता संग्रह प्रसिद्ध करण्याचं .आणि महाराष्ट्रातल्या विविध भागात असलेले हे सगळे जण ,वेगवेगळे व्यवसाय सांभाळून झपाटून कामाला लागले व अक्षरशः एका महिन्यात हा "इवलासा वेलू " हा कवीता संग्रह तयार देखील झाला प्रकाशना साठी !!!
अगदी तारखाच बघाय्च्यात तर २५ मार्च ला ही संकल्पना मांडली गेली व २२ एप्रिल ला हा कवीता संग्रह प्रकाशित होत आहे ,हा देखील एक अनोखा विक्रमच म्हणायला हवाय . "poem is a spontaneous overflow of emotions .." हे खरेच आहे ! जलतरंग किंवा अन्य वाद्यांमध्ये जसे एका तारेला छेडले कि सर्व तारा झंकारू लागतात तशी ही कवी मने भारल्या गेली आणि सहस्पंदित झालीत... !!!
मुळात ह्या प्रयोगाचे वेगळे पण हे की संपूर्ण कवीता या याच समूहात आधी सादर केल्या गेल्या होत्या व मुखपृष्ठ, मागील पाना चे डिझाईन देखील याच समुहातील व्यक्तींनी बनवलेत. पण हे सर्व करतांना प्रत्यक्ष अशा भेटी झाल्याच नाहीत, तर वेगवेगळ्या ठिकाणी राहत असूनही संपादक मंडळाने अगदी वेगाने संकलन, संपादन अशा पायऱ्या पार केल्या .संपादक मंडळात औरंगाबाद चे नवनाथ पवार ,अंबाजोगाई चे दगडू लोमटे ,नागपूरच्या स्वाती धर्माधिकारी यान्नी समन्वय साधला ,चित्रकार शिरीष पवार व डॉ .संजीव केंद्रे यांनी खूप मन लावून काम केले व कवितांसाठी चित्र तयार केली .या कवीता संग्रहात अगदी पहिल्यांदाच कवीता प्रसिद्ध करणारे नवीन कवी आहेत तर काही आधी पासून लेखनात रमणारे असे लेखक /कवी पण आहेत ,सुप्रसिद्ध गझलकार श्री .शिवाजी जवरे यांनी या काव्य संग्रहात आमंत्रित कवी म्हणून काही कवीता दिल्या आहेत ,स्मिता गानू जोगळेकर, महेश कुलकर्णी ,.डॉ.सुनील अहिरराव,स्वाती धर्माधिकारी,.डॉ.यशवंत पाटील,. बालाजी सुतार ,. संतोष वाघचौरे, नवनाथ बंडू पवार,. राजीव मासरूळकर. अर्चना साने, संजय बर्वे., दगडू लोमटे, . प्रशांत अजिंठेकर, .प्रशांत देव ,श्रीराम वाघमारे ,हेमंत सहस्त्रबुद्धे ,फेसबुके अशा महाराष्ट्रातल्या कान्या कोपऱ्यात रहाणाऱ्या कवी मित्रांनी यात आपल्या शब्द फुलांचे झेले सादर केलेत . अशा प्रकारे निव्वळ एका महिन्यात प्रसिद्ध होणारा व फेसबुक वरील कवी मित्रांनी एकत्र येऊन संपादित करून तयार केलेला हा एकमेव संग्रह असावा .या संग्रहाचे प्रकाशक,रेणुका प्रकाशन, औरंगाबाद, हे असून जनशक्ती वाचक चळवळ ने या संग्रहाची अक्षर जुळवणी केली आहे. हा "इवलासा वेलू " पार आभाळा वर चढेल अशी आशा आहे
खर तर ही शाळाच भन्नाट !! बेम्भाटे मास्तरांकडून प्रेरणा घेऊन "फेस बुके "या आज वर कुणीही न बघितलेल्या इसमाने ही "इ-शाळा" काढली .शाळेचा उद्देश हा की यात येणाऱ्या सदस्याने विद्यार्थ्यान सारखे किंवा शिक्षकान सारखे विद्याव्यासंगी बनावे !!या समूहाला ,ज्याला "बेम्भाटे मास्तरांची शाळा" असे म्हंटले जाते त्या शाळेत अक्षरशः अनेक मोठे मान्यवर व्यक्ती देखील लहान होऊन रंगून जातात .जवळपास ३५० सदस्यता असलेल्या या शाळेत अनेक अभिनव उपक्रम राबवले जातात जसे चित्रकला स्पर्धा ,हस्तकला स्पर्धा ..वगैरे वगरे आणि या मध्ये माधवी धोन्गले व अन्य सदस्य सक्रीय पणे भाग घेतात .मुळात "आनंद दायी शिक्षण "असा सगळा कारभार आहे.. इथे कुणी लहान नाही कोणी मोठा नाही.आपल्या मनातली खळबळ सहज व्यक्त करायला ही शाळा हे एक मध्यम आहे .या शाळेतल्या निवांत बेन्चांवर कधी कोणी कवने रचतो,कोणी चित्र काढतं तर कोणी आणखीन वेगळ्या पद्धतीने स्वतः ला व्यक्त करतात .हा जो "पैस " आणि आत्मपरीक्षणाची संधी सर्वांना मिळते त्यातूनच मग अभिनव कल्पना आणि सृजनशील मनांना नवीन उभारी मिळते ,कारण इतरान कडून भरभरून दाद देखील मिळत असते
या संग्रहातील कवितांचा आस्वाद घेतांना कवितांच्या काना मात्रांच्या काटेकोर हिशेबात न पडता रसिक वाचक त्या रचनांच्या मागील उर्मी समजून घेतील ही आशा व अपेक्षा आहे. कोणतेही काम उत्साहाने पूर्ण केल्या नंतर पाठी वरची शाबासकीची थाप फार मोलाचीच असते नाही का ? आणि आमच्या या प्रयत्नांना, साहित्य क्षेत्रातील पितामह श्री. रा. रं. बोराडे सरांनी तेवढ्याच तत्परतेने सुंदर प्रस्तावना लिहून , कौतुकाची मोहोर उठवली. विशेष म्हणजे त्यासाठी आपला संग्रह त्यांनी अत्यंत कमी वेळात वाचून काढला, आणि प्रस्तावना लिहून होताच स्वत: फोन करुन सांगितलेसुद्धा. एकूणच त्यांच्या शब्दांनी आम्हाला पाठीवर हात ठेवून " लढ " म्हणणारा कोणी मान्यवर भेटला. त्यांचे आभार मानण्यापेक्षा त्यांच्या ऋणात राहून आम्ही नम्रपणे फक्त कृतज्ञता व्यक्त करतो.
जिद्द मनात असली तर कोणतही स्वप्न आपण साकार करू शकतो, आणि जर मदतीला मित्र असले तर
मग गोष्टच वेगळी होवून जाते...... कठीण वाटणारा प्रवास पण आपण सहज पूर्ण करू शकतो मित्रांच्या संगतीने...या कवीता संग्रहाच्या निर्मिती पासून अशी प्रेमळ साथ शाळेतल्या सर्वच सदस्यांनी दिलीय ,रश्मी जांभेकर ,संजय सपकाळे या व व अशा अनेक मित्रांनी दिलेल्या त्या प्रोत्साहना मुळेच एका महिन्यात हे कवीता संग्रह काढण्याचे शिवधनुष्य लीलया पेलता आले .
२१ व २२ एप्रिल रोजी नाशिक येथे शाळेच्या सदस्यांचे एक स्नेह संमेलन आयोजित करण्यात आलेय .या संमेलनातच "इवलासा वेलू" या काव्य संग्रहाचे प्रकाशन नामवंत कवी दासू वैद्य यांच्या हस्ते होत आहे. अध्यक्ष स्थानी मिलिंद कोतवाल हे असणार आहेत.
शेवटी फेस बुके गुरुजी म्हणतात त्यात तथ्य आहेच की ,"आपण समजतो तितके हे इंटरनेटचे जग आभासी नाही. आपण या माध्यमा कडे व्यसन म्हणून बघायचं की त्याला सृजन शीलतेच ,कलेच ,संवादाच एक व्यासपीठ मानायचं हा आपलं प्रश्न असतो."
एक मात्र खर की या माध्यमाचा अत्यंत कल्पक पणे उपयोग करून या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी जगण्या कडे /जीवना कडे बघण्याची एक सकारात्मक व कल्पक दृष्टी नक्कीच दिलीय.
संपर्क :- नवनाथ पवार:-७७९८५७१८५८
विनीत
फेसबुके,आणि संपादक मंडळ,
'बेम्भाटे मास्तरांची शाळा',
विद्यार्थी व गुर्जी लोक,फेसबुक,
फेसबुके,आणि संपादक मंडळ,
'बेम्भाटे मास्तरांची शाळा',
विद्यार्थी व गुर्जी लोक,फेसबुक,
1 टिप्पणी:
चांगली बातमी वाचावयास मिळाली .
टिप्पणी पोस्ट करा